यावल तालुक्यात ठीक ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सोयीनुसार चौकशी व कारवाई साठी..?
यावल (सुरेश पाटील) तहसीलदार यावल सौ.मोहन माला नाझीरकर व फैजपूर पोलीस उपनिरीक्षक सय्यद मयनुद्दिन यांच्या पथकाने आज तालुक्यातील कासवे येथील बंद स्टोन क्रशर येथून दोन समान नंबरचे रिकामे असलेले डंपर पकडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली. तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणारे इतरही अनेक ट्रॅक्टर,डंपर यांच्यासह अनेक मोटरसायकली,बुलेट,रिक्षा मिनीडोर, ॲपे रिक्षा ॲपे रिक्षा काली पिली प्रवासी वाहतूक या वाहनांची कागदपत्रे आरटीओ आणि फैजपूर व यावल पोलिसांनी चौकशी करून प्रत्यक्ष तपासणी केल्यास समान नंबर,बोगस नंबर, कालबाह्य असलेले अनेक वाहने पोलीस स्टेशन किंवा आरटीओ विभागात जमा झाल्याशिवाय राहणार नाहीत असे सुद्धा तालुक्यात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
मौजे कासवे येथील बंद स्टोन क्रशर येथून आज गुरुवार दि.12 ऑक्टोंबर 2023 रोजी यावल तहसीलदार सौ.मोहन माला नाझीरकर फैजपुर पोलीस उपनिरीक्षक सय्यद
मयनुद्दीन यांच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दोन समान नंबरचे रिकामे असलेले डंपर पकडले व सदरचे डंपर फैजपूर पोलीस स्टेशन मध्ये पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्यात आले तसेच कासवे येथील नदी पात्राजवळ अंदाजे १० ब्रास रेती साठा जप्त करण्याची कारवाई करून जप्त केलेला साठा यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला याबाबत समान नंबरचे डंपर पकडल्याने फैजपूर पोलिसात गुन्हा नोंदण्याची कारवाई सुरू आहे.[ads id="ads2"]
त्याचप्रमाणे यावल तालुक्यातील मौजे अंजाळे येथील गट नंबर ५६४ / १ मध्ये अंदाजे ७० ते ८० ब्रास, गट नंबर ५५२ मध्ये अंदाजे १० ते १२ तसेच गट नंबर ५८८ मध्ये १० ते १२ ब्रास डबरचा अवैध साठा आढळून आला आहे. त्या अनुषंगाने सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग तसेच तलाठी अंजाळे यावल यांनी संयुक्तिकरित्या डबर साठ्याची पाणी करून गट नंबर ५६४ / १ मधे १११३.०७ ब्रास, गट नंबर ५५२ मध्ये अंदाजे २९.६८ ब्रास,गट नं.५८८ मध्ये १०४.१४ ब्रास असे एकूण मोजमाप अंदाजे १२४६.८९ ब्रास डबर बाबत अहवाल दिलेला आहे तरी मौजे अंजाळे येथे ऊक्त गटांमध्ये आढळून आलेल्या अवैध डबर साठ्याला जाहीर लिलाव करण्याची परवानगीची व पुढील प्रक्रिया फैजपूर भाग फैजपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुरू आहे.
यावल तहसील कार्यालय मार्फत अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती कारवाई करून दंड आकारणी केलेली आहे,परंतु सदर वाहन मालकांनी अद्याप पावतो दंड रकमेचा भरणा केला नसल्याने त्या अनुषंगाने तलाठी यांना सदर वाहन मालकांच्या मालमत्ता विषयक माहिती संकलन करणे कामी सूचना दिल्या होत्या त्यानुसार संबंधित तलाठी यांनी सदर वाहन मालकांच्या नावे असलेले सातबारे उतारे सादर केलेले आहेत त्या अनुषंगाने सदर मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी फैजपूर भाग फैजपुर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केली आहे.
या वाहनधारकांवर होणार कारवाई - यावल तालुक्यातील साकळी येथील नितेश हरी कोळी १ लाख २७ हजार, समाधान मंगल सोनवणे एकूण रक्कम २ लाख ४८ हजार ८५९
सुपडू रमेश साळुंखे राहणार धामणी यांच्याकडून २ लाख २५ हजार १७४ रुपये यांच्या मालमत्तेच्या माध्यमातून दंडाची रक्कम वसूल होणार असल्याची यावल तहसील कार्यालयातून माहिती मिळाली.
तालुक्यातील सीसीटीव्ही कॅमेरे निव्वळ देखावे आणि सोयीसाठी - यावल तहसील व यावल पोलीस स्टेशन,यावल चोपडा रोड यावल फैजपूर, यावल भुसावळ,बोरावल गेट परिसर,यावल बस स्टँड परिसर तसेच शहरात ठीक ठिकाणी असलेले आणि फैजपूर येथील सुभाष चौक,फैजपूर एस.टी. स्टँड परिसर,फैजपूर भुसावल रोड इत्यादी ठिकाणाहून पोलीस बंदोबस्त असताना अनेक सर्व प्रकारची अवैध वाहतूक त्यात प्रामुख्याने अवैध प्रवासी,अवैध गुर - ढोर, अवैध धान्य वाहतूक,गुटका वाहतूक अवैध तसेच बनावट देशी विदेशी दारू पन्नीची दारू, बनावट खवा,भेसळयुक्त दूध, अवैध सागवानी व जळाऊ लाकडाची वाहतूक इत्यादी सह अनेक उद्योग धंदे वाहतूकसह अवैध गौण खनिज वाहतूक ( वाळू वाहतूक बंद असताना विविध ठिकाणी बांधकामे कशी सुरू आहेत..? ) याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये किंवा पोलीस,आरटीओ आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिसून येत नाही का..? सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर फक्त सोयीनुसार केला जातो का? याबाबत सुद्धा यावल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
यावल शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी दुचाकी वाहने बिना पासिंगची,विना नंबर प्लेटची,नंबर प्लेटवर वेगळेच नमूद चिन्ह,कर्कश आवाज करणारी,सिनेमा स्टाईल सुसाट वेगाने धावणारी,कालबाह्य असलेली अवैध प्रवासी व मालवाहतूक वाहने बिनधास्तपणे रस्त्यावर आहेत. यामुळे पोलीस आरटीओ संबंधित अधिकाऱ्यांचा वचक आहे किंवा नाही असे सुद्धा बोलले जात आहे.