मोर्चा तीव्र स्वरूपाचा होता मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने कोळी समाज बांधवांची गर्दी होती तसेच त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आमरण अन्नत्याग उपोषण करते पुढील प्रमाणे आहेत.1) संजय कांडेलकर मुक्ताईनगर.2) नितीन कांडेलकर मुक्ताईनगर.3) नितीन सपकाळे अंजाळे ,तालुका यावल.4) जगन्नाथ बाविस्कर गोरगावले, तालुका चोपडा.5) पद्माकर कोळी डोंगर कठोरा ,तालुका यावल. इत्यादी समाजसेवक त्या ठिकाणी आहेत. [ads id="ads2"]
उपोषणकर्ते जगन्नाथ बाविस्कर पुढे म्हणाले की जिल्ह्यातील कोळी समाजाच्या विविध मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमदार ,खासदार, मंत्री यांना कोळी समाज निवडून आणू शकतो तसे त्यांना पाडण्याची धमक सुद्धा कोळी समाजात आहे याचे शासनाने भान ठेवले पाहिजे. तसेच आमच्या पुढील मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात .1) विनाअटआदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी ,महादेव कोळी ,मल्हार कोळी.चे जातीचे दाखले कोळी नोंद वरून सरसकट मिळावे .2) ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहेत, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावेत.3) जात पडताळणी समिती जळगाव जिल्हा करिता मंजूर आहे परंतु कार्यालय पुढे आहे. ते कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे.4) आदिवासी कोळी समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावे महामंडळ स्थापन करावे. इत्यादी मागण्या यावेळी कराव्यात अन्यथा उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. त्या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते प्रमुख अतिथी प्रभाकर आप्पा सोनवणे जितेंद्र सर अमित सोनवणे अश्विन सोनवणे हरलाल कोळी सुभाष सपकाळे सर मनोहर कोळी खेमचंद कोळी ईश्वर तायडे नारायण कोळी पंडित कोळी पृथ्वीराज जैतकर किशोर कोळी विनोद कोळी भारत कोळी आकाश कोळी तसेच हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी कोळी समाज बांधव उपस्थित होते.