आशांसेविकांना ऑनलाईन कामांची सक्ती नाही...रामकृष्ण पाटील

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल 

           जिल्ह्यात आशा सेविकांना आयुष्यमान कार्ड, गोल्डन कार्ड,ई के वाय सी आणि अन्य ऑनलाईन कामाची करण्यात येत असलेली सक्ती तसेच कामे करताना आशा सेविकांना येणाऱ्या अडचणी याबाबत आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या दालनात आशा स्वयंसेवीका संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली होती.[ads id="ads1"]

        सदर बैठकीत आशा सेविकांना  सर्व ऑनलाईन कामे करण्यासाठी प्रशिक्षण देऊन अँड्राईड मोबाईल फोन देण्यात यावेत,मोबाईल डाटा रिचार्जची रक्कम वाढविण्यात यावी तसेच आशा सेविकांना सदर कामासाठी वरिष्ठांकडून देण्यात येणाऱ्या धमक्या आणि मानसिक त्रास तात्काळ बंद करावा.अशी आग्रही मागणी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी बैठकीत केली.[ads id="ads2"]

         या बैठकीच्या अनुषंगाने आशा सेविकांना कोणत्याही प्रकारच्या धमक्या दिल्या जाणार नाहीत.परंतु आशांनी ऑनलाईन कामे करावी अशी अपेक्षा आहे असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ धर्मेश बिराजदार यांनी सांगितले

           तसेच आशांना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नवीन अँड्राईड मोबाईल देण्याबाबत मा.जिल्हाधिकारी यांचेकडे मागिल आठवड्यात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे तसेच आयुष्मान कार्ड,गोल्डन कार्ड, ई के वाय सी आणि अन्य ऑनलाईन कामे करण्यासंबंधी आशांना प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रशिक्षण देण्याचे तात्काळ नियोजन करण्यात येईल आणि वाढीव डाटा रिचार्ज रक्कम बाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येईल अशा प्रकारची बैठकीत चर्चा करण्यात आली 

  हि  बैठक जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली असून बैठकीत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.धर्मेश बिराजदार जिल्हा समूह संघटक श्री.प्रवीण जगताप संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री.रामकृष्ण बी.पाटील यांच्यासह श्रीमती भागीरथी पाटील,श्रीमती सुनंदा पाटील,श्रीमती सुनंदा हाडपे,श्रीमती उज्वला रावते,श्रीमती चंद्रकला घोलाने,श्रीमती भारती तायडे,श्रीमती उषा पाटील,श्रीमती रुक्कैय्या तडवी,श्रीमती जयश्री विरपण,श्रीमती जयश्री बोंडे,श्रीमती वंदना वाणी,श्रीमती मनिषा बोरनारे उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!