भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर दि.10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार रोजी, भुसावळ शहराच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
दि. 10 नोव्हेंबर रोजी भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन शेजारील कृष्णचंद्र सभागृह येथे सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन युवा आघाडीचा जिल्हास्तरीय मेळावा होणार असून जिल्ह्यातील असंख्य युवा कार्यकर्त्यांचा "भव्य पक्षप्रवेश सोहळा" संपन्न होणार आहे तसेच संध्याकाळी 6 वा. भुसावळ शहरातील पंचशील नगर येथील धम्मदीप बौद्ध विहाराचे लोकार्पण व बुद्धमूर्ती स्थापना सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.[ads id="ads2"]
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, चेतन गांगुर्डे ,शमीभा पाटील यांची देखील उपस्थिती राहणार असून जिल्ह्यातील तमाम युवा कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी केले आहे.