रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
गहू व हरभऱ्याला पाणी घालत असतानाच रावेर तालुक्यातील नांदूरखेडा परिसरात चोरट्यांनी शेतातील व कोठारांतून विजेच्या तारा चोरल्या असून, चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.सुभाष माधव पाटील यांच्या शेतात लावलेल्या ट्रान्सफॉर्मरजवळील सात-आठ खांबांवरील विजेच्या तारा चोरट्यांनी कापल्याचं सांगण्यात येत आहे. [ads id="ads1"]
त्यामुळे आठ ते दहा शेतकऱ्यांच्या शेतात वीज नसल्याने त्यांच्या कूपनलिका मोटारी बंद पडल्या. वीज पुरवठ्याशिवाय ते शेतात पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. या तारा तात्काळ बसवाव्यात व वीजपुरवठा सुरळीत व्हावा व चोरांवर मुसंडी मारावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. कारण, यावर्षी आधीच कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांची उत्पादन क्षमता घटली आहे. [ads id="ads2"]
त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न रब्बी हंगामावर अवलंबून असते. परंतु, हंगाम सुरू होण्यापूर्वीच चोरट्यांनी वीज तारांवर डल्ला मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. असे मनोगत विटवा येथील शेतकरी सतीश पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच विद्युत तारा लवकरात लवकर बसवून चोरट्यांवर लवकरात लवकर आळा घालावा अशी सर्व शेतकरी नागरिकांची मागणी आहेत.



