विद्यार्थ्यांनो जिद्दीने यश मिळवा - प्राचार्य वाय.एल.पाटील सर यांचे प्रतिपादन..

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 विद्यार्थ्यांनो जिद्दीने यश मिळवा - प्राचार्य  वाय.एल.पाटील सर यांचे प्रतिपादन..


 रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : प्रतिकूल परिस्थितीचे तुणतुणं वाजत बसण्यापेक्षा हिमतीने ..जिद्दीने...शिक्षण घेवून पुढे पुढे चालत रहा नक्कीच यश तुमच्या पदरात पडल्या शिवाय राहणार नाही. असा मौलिक उपदेश एन.जी.पाटील माध्यमिक विद्यालयाचे  आदरणीय प्राचार्य गुरुवर्य श्री. वाय. एल.पाटील सर यांनी केला.[ads id="ads1"]

  घटनाकार संविधान निर्माते तुम्हां आम्हां समस्त भारतीयांना हक्क,अधिकार,न्याय समता,बंधुता बहाल करणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिन...विद्यार्थी सन्मान म्हणून प्रागतिक विचारमंच व आम्ही वर्गमित्र परिवार उदळी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा उदळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.[ads id="ads2"]

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमच्या उदळी गावातील प्रतिष्ठित केळी व्यावसायिक आदरणीय श्री.सुधीर पाटील सेठ,प्रगतिशील शेतकरी आदरणीय श्री ललित भाऊ पाटील...आदरणीय गुरुवर्य वाय.एल.पाटील सर,गोपी सेठ,पंढरी पाटील, नितीन पाटील, डी. एम .पाटील समाधान बा -हे,श्रीमती माया देवी बाऱ्हे (माजी उपसभापती रावेर  पंचायत समिती ) सुमित बा -हे,ग्रामपंचायत सदस्य रमेश बा -हे,जयश्री पाटील,हर्षाली चौधरी,अश्विनी बा-हे ,भूषण पाटील, डॉ.शिरीष बा -हे.विचारमंचवर उपस्थित होते.प्रथमतः वंदनीय छत्रपती शिवराय..पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या..प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले....उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले...यानंतर विद्यार्थ्यांना वही,पेन्सिल,सफरचंद, केळी पाहुण्यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आली...याप्रसंगी  आदरणीय श्री बाळू जावरे सर..(भुसावळ) ..आदरणीय .गोपी पाटील सेठ ..आदरणीय श्री वाय .एल. पाटील सर यांनी मनोगते व्यक्ती केली..कार्यक्रमाचे   प्रास्ताविक पवन सर यांनी तर बहारदार सूत्रसंचालन श्री विनोद बा -हे सर यांनी केले .कार्यक्रम यशस्वितेसाठी सौ.वैशाली पाटील,सौ.सीमा चौधरी मॅडम शिक्षिका भगिनी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!