रावेर लोकसभा,विधानसभा मतदारसंघ मतपेटीत विपरीत परिणाम दिसणार..!
यावल ( सुरेश पाटील )
१ ते २ दशकाचा कालावधी उलटला तसेच गेल्या १० वर्षाच्या कालावधीत रावेर ते पाल रस्ता जागोजागी खड्डे असलेल्या स्थितीचा रस्ता जसाचा तसाच आहे,त्यामुळे आदिवासी नागरिकांना तथा सर्व स्तरातील ग्रामस्थांना विविध कामांसाठी तालुका व जिल्हास्तरावर जाण्यासाठी येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने सर्व स्तरात मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.तसेच रस्त्याच्या कामाबाबत डागडुजी बाबत अनेक वेळा ग्रामस्थांकडून मागणी करून सुद्धा लोकप्रतिनिधी,शासकीय,अधिकारी,कर्मचारी रस्त्याचे काम करीत नसल्याने संपूर्ण आदिवासी विभागातून आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,लोकसभा,विधानसभा निवडणुकांमध्ये मत मागणी करण्यासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारणार असून त्यांना आपल्या भावना मत पेटीतून परिणामकारक दाखविणार असल्याचे चित्र संपूर्ण आदिवासी भागात निर्माण झाले आहे. [ads id="ads1"]
अनेक अवजड वाहनांची वाहतुक रोज पाल ते लालमाती कुसुंबा मार्गे रावेरकडे होत आहे वाहन चालवणा-याला तर या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाट शोधणे अवघड झाले आहे. लालमाती घाटाचे गेल्या २ ते ३ वर्षापुर्वी खोदकाम करण्यात आले होते तर त्या घाटाला रस्त्याने संरक्षण नाही.रस्ता पूर्ण उखडून खड्डे पडले आहेत. रस्ता दर्जेदार बांधकाम न करता निकृष्ट बांधकाम साहित्यात रस्ता बनवला तरी कसा..? आणि एक दोन पावसातच रस्ता वाहुन गेला कसा ? रस्ते कामे नेमके होतात तरी कसे.? रस्ता बांधकाम झाल्यानंतर एकाच महिन्यात रस्त्यावर खड्डे पडतात.रस्ते फक्त १ ते २ महिने राहतील याचप्रमाणे बांधकाम केले जाते का.?[ads id="ads2"]
रावेर तालुक्यातील लालमाती पाल हे अतिदुर्गम आदिवासी ग्रामीण क्षेत्र आहे येथील रस्त्यांची अवस्था बघता कुठे नेवुन ठेवला आदिवासी क्षेत्राचा विकास असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो प्रसिद्धी माध्यमातून बऱ्याच वेळेला वृत्त प्रसिद्ध झाले आहे परंतु लोकप्रतिनिधीसह संबंधित प्रशासनाचे,अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
रावेर तालुक्यातील पाल, सहस्रलिंगअतिदुर्गम असलेल्या लालमाती,कुसुंबा,मुंजलवाडी,
पाल, सहसलिंग् शिंदखेडा, गावाच्या रस्त्याच्या चारी दिशांना जिकडे जाल त्या रस्त्यावर जागोजागी खड्डे असलेले रस्ते आहेत,रस्ता आहे किव्वा नाही..? असा प्रश्न रस्त्यावरून चालणाऱ्यांना, वाहनधारकांना पडला आहे.
रस्ता काम होते,डागदुजी होते,परंतु लगेच महिना,दोन महिना कालावधीत जसेच्या तसे खड्डे पडतात अस का होते ? आणी मुंजलवाडी ते कुसुंबा पर्यंत नुतनीकरण केलेल्या रस्त्यावरचे आजुबाजूच्या कडेला साईटपट्या बनविल्या तर त्यात ही मोठाले गिट्टी नामक दगडांचा वापर केला त्यामुळे वाहने घसरण्याचा,स्लीप होण्याचे बऱ्याच वेळेला होत असतात.दर्जाहीन कामाचा हा खेळ प्रवाश्यांच्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या जिवाशी खेळला जात आहे,काही कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी / नेते /अधिकारी याकडे लक्ष केंद्रित का करत नाहीत..? लालमाती, सहस्रलिंग,कुसुंबा,लोहारा, मुंजलवाडी,शिंदखेड,ह्या गावातील विकास कामे रस्ते हे खड्डेयुक्तच राहणार आहेत का?संबंधित विभाग का दुर्लक्ष करतय ? संबंधित काही लोकप्रतिनिधी मुंग गिळून गप्प का आहेत ! स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या संबंधित विभागातील कामांना वरिष्ठ नेतेमंडळी,अधिकारी महत्त्व देत नाहीत का..? असे संतप्त अनेक प्रश्न ग्रामस्थांमध्ये आदिवासी भागात उपस्थित केले जात आहेत.