यावल( सुरेश पाटील )
चमत्कारा मागे विज्ञान व हातचालाखी : डी. एस. कट्यारे
कुठलाही चमत्कार हा चमत्कार नसतो तर त्यामागे विज्ञान असते व बऱ्याच वेळ हात चालाखी द्वारे चमत्कार दाखवण्याचा हा प्रयत्न केला जातो तेव्हा चमत्कारामागील विज्ञान प्रत्येकाने जाणुन घ्यायला हवा असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष डी.एस. कट्यारे यांनी केले ते तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेत आयोजित फटाके मुक्त दिवाळी व चमत्कार मागील विज्ञान या कार्यक्रमात बोलत होते.[ads id="ads1"]
या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेले विविध चमत्काराचे प्रयोग लक्षवेधी ठरले डोंगरकठोरा ता.यावल येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाची आश्रम शाळा आहे.या आश्रम शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने फटाके मुक्त दिवाळी आणि चमत्कार मागील विज्ञान या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला.[ads id="ads2"]
प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष डी. एस. कट्यारे हे होते या प्रसंगी त्यांनी विविध जादूचे प्रयोग आणि त्यामागील विज्ञान याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर या कार्यक्रमात फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला अनेक जादूचे प्रयोग दाखवून त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवण्यात आला या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डी.एस.कट्यारे सह अंनिसचे आनंद ढिवरे,प्रशांत महाजन,युनूस तडवी,शेखर पटेल, मुख्याध्यापक शिवहरी वानखेडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात युनूस तडवी यांनी विद्यार्थ्यांना श्रध्दा व अंधश्रध्दा यातील फरक स्पष्ट करून सांगीतला.या कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालन शेखर पटेल यांनी केली तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक शिवहरी वानखेडे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.