महिला शिबिरामध्ये चमत्कार सादरीकरणाद्वारे महिलांचे प्रबोधन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

महिला शिबिरामध्ये चमत्कार सादरीकरणाद्वारे महिलांचे प्रबोधन

मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : तालुक्यातील नायगाव गावात भारतीय बौद्ध महासभेच्या महिला उपासीका प्रशिक्षण शिबिरामध्ये काल महा अंनिस चे कार्यकर्ते प्रा. आनंद ढिवरे यांनी चमत्कार सादरीकरणाच्या प्रयोगातून महिलांचे प्रबोधन केले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात नायगाव गावात भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका शाखेकडून महिलांचे शिबिर सुरू आहे. [ads id="ads1"]

  या शिबिरामध्ये दररोज वेगवेगळ्या विषयांद्वारे महिलांचे प्रबोधन केले जाते. त्याच अनुषंगाने काल प्रा. आनंद ढिवरे यांनी महिलांना अंधश्रद्धा निर्मूलन, बुवाबाजी, भोंदूगिरी, व्यसनमुक्ती यावर चमत्काराचे सादरीकरण प्रयोगाद्वारे करून जनजागृती व प्रबोधन केले. या प्रयोगांमध्ये कागदाच्या चिठ्ठीवर लिहिलेले चिट्ठी न उघडून चिठ्ठीत काय लिहिले आहे ते सांगणे, डोळे बंद करून महिलेने कोणत्या वस्तूला हात लावले आहे हे बरोबर ओळखणे, महिलांकडून घुंगरू न वाजता घुंगरू वाजवून दाखवणे, गढू (तांब्या) यामध्ये पाणी गायब करणे आणि नंतर त्यातून पाणी काढून दाखवणे, गढू किंवा तांब्या यामध्ये तांदूळ टाकून भूत पकडणे आणि सर्वात शेवटी पाण्यावर दिवा लावून दाखवणे हा महत्त्वपूर्ण प्रयोग करून दाखविले. [ads id="ads2"]

  अतिशय उत्सुकतेने महिलांनी हे प्रयोग बघितले आणि त्या मागची कारणे शोधून काढण्याचा प्रयत्न केला. प्रा. आनंद ढिवरे यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही वैज्ञानिक कारण असते, त्या कारणांचा आपण शोध घेतला पाहिजे असे सांगून, करून दाखवलेल्या प्रत्येक प्रयोगाच्या मागचे कारण महिलांना सांगितले. तेव्हा महिलांना या प्रयोगा मागील वैज्ञानिक कारणे समजले आणि जगामध्ये कुठेही चमत्कार नाही यावर त्यांचा विश्वास बसला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्ताईनगर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आद. रविंद्र मोरे साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शाखा जळगाव पूर्वचे संरक्षण विभागाचे सचिव आद. एस पी जोहरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आद. दिलीप पोहेकर, तसेच विश्वनाथ जी मोरे उपस्थित होते. तसेच मोठ्या प्रमाणात उपासक, लहान बालके, बालिका आणि ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आयोजकांकडून बुंदी दान करण्यात आली आणि चहाचे वाटपही करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!