यावल पोलीस स्टेशन जवळील अवैध बनावट ताडीचा अड्डा उध्वस्त : बिल्डर,समाजसेवकाचे पितळ उघड आणि पार्टी खाणारे गप्प

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील ) पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अवैध, बनावट आणि आरोग्यास हानिकारक अशा 'ताडी' दारूचा अड्डा दारू उत्पादन शुल्क विभागाने काल शनिवार दि.९ डिसेंबर २०२३ रोजी उध्वस्त केला.या प्रकरणात अवैध बनावट ताडी ' ज्या ठिकाणी विक्री होते ती जागा यावल शहरातील एका बिल्डरची आणि ताडी विक्री करणारा पर राज्यातील असलेल्या भाडेकरूचा मालक शहरातील स्वतःला  समाजसेवक म्हणून घेणारा असल्याने त्यांचे पितळ उघडे पडले परंतु गेल्या महिन्यात पार्टी खाणाऱ्यांना ही घटना न समजल्याने संपूर्ण यावल शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.[ads id="ads1"]

   तसेच त्याच बिल्डरच्या दुसऱ्या एका घरात बनावट ताडी तयार करण्याचा घरगुती कारखाना असल्याने यावल शहरात अवैध बनावट आरोग्यास हानिकारक अशी रसायन युक्त ताडी विक्री होत असल्याने संबंधित दारू उत्पादक शुल्क विभागाचे निरीक्षक हे सुद्धा तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे किंवा नाही याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

          अधीक्षक यांच्या आदेशाची पायमल्ली -भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक यावल यांनी मेरगु  व भागीदार याच्या नावे यावल येथे असलेल्या ताडी दुकानांचे व्यवहार तात्काळ बंद करून त्याबाबतचा अहवाल या कार्यालयात सादर करावा. तसेच आपल्या कार्यक्षेत्रात सदर ठिकाणी अवैध ताडी विक्री होणार नाही यांची दक्षता घ्यावी जर तसे आढळून आल्यास आपणा विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे लेखी पत्र वजा आदेश जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही.टी.मुकने यांनी गेल्या २ महिन्यापूर्वी म्हणजे ४ ऑक्टोबर २०२३ रोजी भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक यांना दिले होते आणि आहे. [ads id="ads2"]

  त्यानुसार दुकानावर कारवाई करण्यात आली परंतु अधीक्षक यांची दिशाभूल करीत दुसऱ्या ठिकाणी एका बिल्डरच्या मालकीच्या जागेवर दुकानात बनावट आरोग्यास हानिकारक अशी ताडी दारू प्लॅस्टिक पिशवीत भरून सर्रासपणे विक्री करण्यात येत होती त्या ठिकाणी काल शनिवार दि.९ रोजी दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका डीवायएसपीने अचानक धाड टाकून बनावट ताडी दारू नष्ट केली. ही कारवाई करताना मात्र त्या बिल्डरच्या दुसऱ्या घरात ज्या ठिकाणी बनावट ताडी दारू तयार केली जाते त्या ठिकाणी धाड न टाकता दुकानावर धाड टाकून कारवाई केली.गुन्हा दाखल का केला नाही..? यावल पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर बेकायदा बनावट ताडी विक्रीचा गोरख धंदा आणि भुसावळ रोडवर एका घरात बनावट ताडी उत्पादन करण्याचा गोरख धंदा यावल पोलिसांना दिसून न आल्याने /आणि न समजल्याने तसेच शहरात उत्पादन शुल्क विभागाने एवढी मोठी कारवाई केली परंतु कोणाला न समजल्याने ( पार्टी खाणाऱ्यांना ) याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!