महिला ग्रामसेविकेशी दंडेलशाही : रावेर पोलिस स्टेशनमध्ये ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्ष, सचिवाविरुद्ध गुन्हा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : गेल्या तीन चार दिवसापासून पंचायत समिती रावेर (Panchayat Samiti Raver) येथील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रस्तावाचे प्रकरण गाजत आहे. ग्रामसेवक संघटनेच्या स्वयं घोषित पदाधिकारी यांचेशी विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे यांनी संगनमत करून आपल्या मर्जितल्या ग्रामसेवकांचे प्रस्ताव जळगाव जिल्हा परिषदेला (Jalgaon  Zilha Parishad) पाठवल्याची माहिती मिळताच प्रस्तावात सहभागी असलेल्या मुंजलवाडी येथील ग्रामसेविका श्रीमती कविता रतन बोदडे आणि बलवाडी येथील ग्रामसेवक प्रकाश तायडे दोन दिवसांपासून रावेर पंचायत समितीला(Raver  Panchayat Samiti) येऊन विस्तार अधिकाऱ्याला जाब विचारत आहेत ; मात्र आज माहिती देतो असं सांगून विस्तार अधिकारी शिंदे स्वतः च कार्यालयात आले नाहीत.[ads id="ads1"]

त्यांची त्यांच्याच दालनात दोघे ग्रामसेवक दुपारी वाट पाहत असतांना आणि दुसरे विस्तार अधिकारी पाटणकर हजर असतांना दुपारी २.३० वाजेच्या सुमारास रावेर पंचायत समितीत (Raver Panchayat Samiti) रावेर तालुका ग्रामसेवक युनियन डी एन इ १३६ चे अध्यक्ष राहुल रमेश लोखंडे आणि सचिव अतुल जगन्नाथ पाटील  यांनी महिला ग्रामसेविका श्रीमती कविता रतन बोदडे यांच्या अंगावर जाऊन त्यांना धक्काबुक्की केली.[ads id="ads2"]

  'तुझा शहाणपणा आम्ही चालू देणार नाही, पुरस्कार तुझा अधिकार नाही.तुला पाहून घेऊ 'असे धमकावल्याने श्रीमती कविता बोदडे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात (Raver Police Station)ग्रामसेवक युनियन चे  अध्यक्ष राहुल रमेश लोखंडे आणि सचिव अतुल जगन्नाथ पाटील यांच्याविरुद्ध भा. द.वि.१८६० कलम ३२३, ५६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा: नरेंद्र मोदी हे लोकशाहीतले, तर मोहन भागवत हे संघटनेतील हिटलर - ॲड. प्रकाश आंबेडकर यांची जळगावात टिका 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!