रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रावेर येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विविध पक्ष, संघटना, अधिकारी व पदधिकारी यांचे कडून अभिवादन करण्यात आले. [ads id="ads1"]
यावेळी भारतीय बौध्द महासभेचे केंद्रिय शिक्षक संघरत्न दामोदरे, राजेंद्र अटकाळे,विजय अवसरमल , विजय भोसले व सदाशिव निकम,यांनी त्रिशरण पंचशील , भीमस्मरण व भीमस्तुती घेतले. यावेळी रावेर चे तहसीलदार बंडू कापसे, कामगार नेते दिलिप कांबळे, माजी नगराध्यक्ष दारा मो. माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, माऊली फाऊडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, डॉ. सुरेश महाजन, माजी नगरसेवक जगदीश घेटे, माजी नगरसेवक ॲड. योगेश गजरे, काँग्रेस अनुसूचित विभाग प्रदेश सचिव राजू सवर्ने यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दीप पूजा, धूप पूजा व पुष्प पूजा करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विद्युत तांत्रिक कर्मचारी संघटना अध्यक्ष भिका साळुंखे,शिवसेना शहर प्रमुख अशोक शिंदे, प्रा.संदीप धापसे, प्रा.चतुर गाढे, प्रा.सत्यशील धनले,रावेर तलाठी स्वप्नील परदेशी, मंडलाधिकारी यासीन तडवी,

(रक्तदान शिबिरामध्ये कविता विजय भोसले रक्तदान करताना दिसत आहे. )
वंचित बहुजन आघाडी तालुकाध्क्ष बाळू शिरतुरे, पीपल्स बँकेचे निवृत्त व्यवस्थापक प्रकाश महाले, दै.लोकशाही उपसंपादक दिपक नगरे, adv सुभाष धुंदले, जे. व्ही. तायडे सर, निवृत्त मुखयाध्यापक कैलास भालेराव, जिल्हा बँकेचे निवृत्त व्यवस्थापक अजाबराव पाटील,सामाजिक समता मंच कार्याध्यक्ष उमेश गाढे, सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक तायडे, adv.व्हीं.पी.महाजन, तुषार मानकर, भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष राहुल डी गाढे, शहर कोषाध्यक्ष धनराज घेटे, निवृत्त सैनिक युवराज गाढे, काँग्रेसचे नेते महेश लोखंडे, पत्रकार संतोष कोसोदे, पत्रकार चांगो भालेराव, साहेबराव वानखेडे, पुंडलिक कोंघे, ज्ञानेश्वर अटकाळे, रघुनाथ कोंघे, [ads id="ads2"]भीमराव तायडे, वामनराव तायडे, रमेश तायडे,समता सैनिक दलाचे अर्जून वाघ, शशीकांत भालेराव सर, निवृत्त पोलीस कॉनस्टेबल धांडे,सुनिल मेढे,अशोक इंगळे, किशोर तायडे, सम्यक इंगळे , रत्नाकर बनसोडे,अजय तायडे, विशाल लहासे, धोनी तायडे आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व आदरांली वाहिली.यानंतर बहुजन युवक संघटने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विकास अटकाळे, समाधान तायडे,चांगो भालेराव व अर्जून वाघ कविता विजय भोसले यांनी प्रथम रक्तदान करून केले तर संजीवनी रक्त संकलन पतपेढी फैजपूर येथील वैदयकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप भारतीय बौध्द महासभेचे तालुका संघटक पी. के. महाले यांनी गायिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर अत्यंत सुंदर गीताने करण्यात आला. यावेळी रावेर तालुक्यातील बौद्ध समाजातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.



