यावल (सुरेश पाटील)
येथील श्रीव्यास व श्रीराम मंदिरात दि.16/12/23 पासून दरवर्षीप्रमाणे धार्मिक सप्ताह आयोजित करण्यात आला.त्या निमित्ताने यावर्षी श्री विष्णुपुराण व महाविषणयाग यज्ञाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.[ads id="ads1"]
दि.16/12/23 पासून महा विष्णुपंत यज्ञास सुरूवात करण्यात आली.सदर धार्मिक यज्ञास बहुसंख्येने जोडप्यांनी भाग घेतला.तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक यज्ञाचे पुरोहित म्हणून अतुल बाविसे,मुळे,बैरागी यांनी सुरेल आवाजात मंत्रोच्चार म्हणत पौरोहित्य केले.दररोज यज्ञासाठी 19 जोडप्यांनी भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.सदर यज्ञासाठी यावल शहरातील तसेच जळगाव,चितोडा,आडगाव, किनगाव,धानोरा येथील भाविकांनी उपस्थिती देऊन भाग घेतला.सदर कार्यक्रमाची आज सोमवार दि.18/12 /2023 रोजी समारोप करण्यात आला समारोप आरतीच्या वेळेस भाविक गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.नंतर सर्व भाविकांनी अशोक महाजन पुरस्कृत महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळेस बाउस्कर सर, प्रमोद गडे,रामभाऊ करांडे,शशीकांत देशमुख,राजू टेलर,सुनील भोईटे,गुरव अप्पा, रमेश बोंडे,उपेंद्र फालक, नामदेव बारी आदींनी उपस्थित राहुन सहकार्य केले.[ads id="ads2"]
महाविषणुयाग यज्ञ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बिल्लू महाराज यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले.सदर कार्यक्रमास भुवन महाराज यांनी सहकार्य केले.