रावेर तालुक्यातील सांगवे / विटवे येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे




रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आज सांगवे/विटवे  येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्व प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवे /विटवे येथील विद्यार्थ्यांनी  गावात, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, अशा घोषणा देत प्रभात फेरी काढ़त ध्वजारोहण, ग्रा. पं. कार्यालय विटवे येथे ज्येष्ठ  नागरिक गंभीर शेनू चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.[ads id="ads1"]
 तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आयु. महेंद्र कोळी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यातआले . यावेळी विद्यार्थी यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेत प्रजासत्ताक दिन कशासाठी व का या  विषयावार वकृत्व केले यानंतर ग्रा. पं. तर्फे  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले  तसेच सांगवे /विटवे गृप ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेड़े यानी प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने आपले मनोगत व्यक्त  करताना सांगितले की दि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागु झाले, त्या दिवसापासून आपल्या देशात लोकशाही निर्माण झाली, त्या लोकशाही मुळे सर्व भारतीयांना हक्क अधिकार मिळाले त्या भारतीय संविधानाची जनजागृती करणे व .मि सर्व प्रथम भारतीय आणि अंतिम ही भारतीय हे ब्रीद वाक्य सर्व भारतीय नागरीकांच्या मनात रुजले पाहिजे अशा आशयचे मनोगत व्यक्त केले.[ads id="ads2"]
  या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी ग्रामसेवक जगदीश बावीस्कर,  मुख्याध्यापक, शिक्षक,आंगनवाड़ी सेविका, आशा सेविका,कृषी सहाय्यक शेखर वाघ, आरोग्य अधिकारी , सांगवे पोलिस पाटील, माजी उपसरपंच, सुरेश कोळी,दादाराव कोळी, (महाराज) उपसरपंच ईश्वर चौधरी, ग्रा. पं. सदस्य मधुकर पाटील,  गणेश मनुरे, कैलास मनुरे, गजानन कोळी, वैभव चौधरी,पोलिस पाटील बाळु पवार,  विमल भिल्ल,  सुरेश तायड़े, शिवाजी कोळी,पंकज कोळी,  श्रीराम कोळी , नरेंद्र वानखेड़े , सलीम शेख, रतन भिल्ल,व गावातील महिला तरुण, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!