रावेर येथील रा.का. इंटरनॅशनल स्कूल मध्ये आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


    रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) : दिनांक 11 जानेवारी या दिवशी रा.का. स्कूलचे अध्यक्ष श्री. महेंद्र राजाराम पवार यांच्या वडिलांची श्री. राजाराम काशीराम पवार आप्पा यांचे पुण्यस्मरण. ज्यांच्या नावावरती आज रा.का. इंटरनॅशनल स्कूल ओळखली जात आहेत ते म्हणजे राजाराम काशीराम पवार त्यांना सर्व प्रेमाने आप्पा बोलत असत. [ads id="ads1"]

  त्यांना आज आपल्यामध्ये जाऊन 11 वर्षे पूर्ण झाली. परंतु त्यांनी त्यांच्या काळी जी ज्ञानाची ज्योत पेटवलेली होती तीच ज्योत हाती घेऊन रा.का. इंटरनॅशनल स्कूल आज  घरी घरी पोहोचवत आहे. त्यांचा जीवनाचा प्रवास सर्वांना माहीत व्हावा व त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज शाळेमध्ये आजी आजोबा मेळावा राबवण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांवरती संस्कार घडावे त्यांना आजी आजोबाचे महत्त्व कळावे व आजच्या पिढीला आजी आजोबा व नातू यांच्यामधील जिव्हाळा काढावा यासाठी हा कार्यक्रम आपल्या शाळेत राबवण्यात येतो.[ads id="ads2"]

   शिक्षणासोबतच संस्कृती देखील मुलांमध्ये रुजावी यासाठी शाळा नेहमी कार्य करत असते आणि त्याच कार्यामधून हा आजचा आजी-आजोबा मेळावा पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा उपस्थित होते. यात विद्यार्थ्यांनी आलेल्या आपल्या आजी आजोबांचे चरण धोऊन त्यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद मिळवला आणि छान असा अविस्मरणीय कार्यक्रम आज पार पडला. या सर्व कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. महेंद्र राजाराम पवार सचिव सो.मानसी महेंद्र पवार व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!