रावेर येथे दगडफेक ; पोलिसांच्या सतर्कतेने परिस्थिती नियंत्रणात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथे दगडफेक करण्यात आल्याची घटना रविवारी दिनांक  21 जानेवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास रावेर शहरातील भोईवाड्यानजीक घडली. यात दोन जण जखमी झाल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी १२ ते १५ जणांना ताब्यात घेतले आहे. [ads id="ads1"]

  पोलिसांनी अवघ्या काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. घटनेची माहिती कळताच जळगांव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी यांनी रात्रीच रावेर येथे भेट दिली. तसेच या प्रकरणात कोणताही दोषी सुटणार नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.[ads id="ads2"]

संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कुणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच  रावेर येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तर रावेर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री.अडसूळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. समाजमाध्यमातून अफवा न पसरवण्याचे आवाहन पोलिस प्रशासन व महसूल मार्फत करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!