रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :  रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेख याकूब शेख नजीर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर संपन्न झाली.[ads id="ads1"]

श्रद्धेय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशान्वये येणाऱ्या लोकसभा निवडणुकी संदर्भात आदेश प्राप्त झाले असून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवित असून कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आदेश प्राप्त झाले आहे. तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील बुथ बांधणी संदर्भात या बैठकीचे आयोजन केले असून कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर बुथ बांधणी करावी आणि तसा रावेर तालुक्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात सादर करायचा आहे. तरी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली पाहिजे. असे वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी कार्यकर्त्यांना सुचवले आहे.[ads id="ads2"]

या बैठकीत विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये उपस्थित असलेले पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कोंगे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अटकळे शहराध्यक्ष राहुल गाढे, ता. उपाध्यक्ष सलीम शहा यासीन शहा, ता. संघटक कंदरसिंग बारेला ता. उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, ता. सचिव राजेंद्र अवसरमल, राहुल लहासे, मनोहर ससाणे, अजय तायडे, यशवंत चौधरी, शे. इमरान शे. इब्राहिम उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन ता. सरचिटणीस कांतीलाल गाढे यांनी केले तर आभार अजय तायडे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!