जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे विविध कार्यक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) :  माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात  गीत,नृत्य,नाटिका सादर करण्यात आल्या.नाटिकेद्वारे शिक्षणाचे महत्व याची शिकवण देण्यात आली. [ads id="ads1"]

    कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले  माजी प.स सभापती सौ कविता हरलाल कोळी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पुरी, गोलवाडे,भामलवाडी येथील महिला ग्रामपंचायत ' सदस्य,गावातील विविध पदाधिकारी व  ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.[ads id="ads2"]

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री राहुल पाटील सर यानी केले तर सूत्र संचालन श्री शिवाजी पाटील सरानी केले . कार्यक्रम   यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री मनोज पाटील सर व संस्थेच्या संचालिका सौ प्रतिक्षा मॅडम यानी सर्वांचे कौतुक केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!