यावल ( सुरेश पाटील )
आज शनिवार दि.२७ जानेवारी २०२४ रोजी यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सौ.सारिका पाटील (पोलीस काँस्टेबल यावल ) , सौ.निर्मला महाजन मॅडम तसेच सौ.मंगला फेगडे मॅडम तसेच सरस्वती विद्यामंदिर शाळेचे सर नरेंद्र महाले सर इत्यादी उपस्थित होते.सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.नरेंद्र महाले सर यांनी मुलगी व आई या नात्यावर अत्यंत सुंदर असे भाषण करून सर्व महिला वर्गांना सुंदर अशी माहिती दिली.[ads id="ads1"]
तद्नंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.हळदी कुंकवामध्ये महिला वर्गांचे उखाणे तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच वाण देण्यात आले.राजेंद्र महाजन सर व सौ.निर्मला महाजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशांत फेगडे सर व सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.[ads id="ads2"]
या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. टिना निंबाळे मॅडम तसेच सौ. कुंदा नारखेडे मॅडम व सौ. अर्चना चौधरी मॅडम यांनी केले.अशाप्रकारे हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला.


