विवरे ता.रावेर (समाधान गाढे) शाळा हे समाजाचे छोटे रुप असते जसा समाज तशी शाळा समाजसुधारकांचा गौरव समाजात जनप्रबोधनाद्वारे तो परिणामकारक ठरतो. या भूमिकेतून जि प मुलींची शाळा विवरे बु.।" शाळेचा सावित्रीआई फूले जयंतीत्सोव विवरे बु.॥ येथील माळीवाड्यात साजरा करण्यात आला..[ads id="ads1"]
सकाळी प्रभातफेरी द्वारे सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या वेशभूषे द्वारे घोषणा देत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर येथिल जिरीमाळी सेवा संघटनेचे कुटुंब प्रमुख सुरेश चांगदेव इंगळे यांचे हस्ते प्रतिमापूजन केले गेले. कार्यक्रमास विवरे बु गावातील सरपंच युनूस तडवी, उपसरपंच विनोद मोरे ग्रापं सदस्य वासुदेव नरवाडे, शिवाजी पाटील, मनिषा पाचपांडे, निलीमा सनसे, पूनम बोंडे उपस्थित होते.[ads id="ads2"]
यावेळी उपसरपंच विनोद मोरे, सदस्य वासुदेव नरवाडे, गणेश खुर्दे सर यांनी मनोगतातून सावित्रीबाई च्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला त्यानंतर विवरे बु कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण, नाट्यकला एकांकिका व नृत्यांव्दारे सावित्रीबाईचा जीवनपट मांडला. अतिशय बहदार कलाविष्काराव्दारे विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रम यशस्विततेसाठी श्री. विलास सपकाळ श्री टिकाराम भुनघरे, श्री प्रमोद सनसे, श्री. पिंटू माळी श्री. सूरज नरवाडे, श्री. योगेश महाजन श्री दिनेश माळी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवरे बु कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अविनाश बागूल सर यांनी केले.


