ऐनपूर (विनोद हरी कोळी) : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे दि. ०३ जानेवारी २०२४ या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील वरिष्ठ प्रा. डॉ. आर. पी. पाटील या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. डी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. [ads id="ads1"]
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी आपल्या भाषणातून आजही बहुसंख्य महिला समाज हा शिक्षणापासून वंचित आहे. या समाजातील स्रिया मागे राहण्याचे कारण समाजाचा परंपरावादी दृष्टीकोन असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला रा. से. यो. विभागीय समन्वयक डॉ. जे. पी. नेहेते हे उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी ह्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा चालवीत आहेत. समाजात या विद्यार्थिनी मार्गदर्शक अशी तत्वे प्रचार आणि प्रसार करीत आहेत असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले. [ads id="ads2"]
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. आर. पी. पाटील यांनी महिला पुढे येण्यासाठी आघाडीवर असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचे उदाहरणे दिली. जसे मा. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू, अर्थमंत्री निर्मला सितारमण इ. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील यांनी तर डॉ. नीता वाणी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाटील यांनी आयोजन केले.


