रावेर प्रतिनिधी (मुबारक तडवी) : मोठा वाघोदा .ता रावेर येथे आज पासून श्रीमद् उध्दरण प्रकरण निरोपण ज्ञानयज्ञ सोहळा व संन्यास दीक्षा पंचावतार उपहार महोत्सव दि. २६ जानेवारी पासुन मोठ्या हर्ष उत्साहात मोठे वाघोदे या नगरीत श्रीमद् उध्दरण प्रकरण निरोपण ज्ञानयज्ञ सोहळा व संन्यास दीक्षा पंचावतार उपहार महोत्सव प्रारंभ होत आहे कार्यक्रमाला महाराष्ट्र तथा पंजाब व संपूर्ण भारत भरातून संतमंडळी, आचार्य मंडळी व महानुभाव अनुयायी वर्ग यांची पावन उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे प्रवाचक प. पु. या प. म. आचार्य प्रवर श्री.सातारकर बाबाजी यांच्या मुखारविंदातून १७ दिवस उध्दरण प्रकरना वर निरोपण सद्भक्तांना ऐकन्यास मिळनार आहे.[ads id="ads1"]
कार्यक्रमा अंतर्गत दि. १० फेब्रुवारीला 2024 ला संन्यास दीक्षा विधी व पंचावतार उपहार व भव्य मिरवणूक हा कार्यक्रम संपन्न होईल व दि ११ फेब्रुवारीला या कार्यक्रमाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न होईल. नित्यदीनी सकाळी ९ ते १० प्रवचन दुपारी ३ ते ५ प्रवचन सायंकाळी ८ ते १० किर्तन तथा भजन संध्या सद्भक्तांना ऐकण्यास मिळेल.[ads id="ads2"]
कार्यक्रमाच्या शुभारंभदीनी दि २६ ला सकाळी ८ वाजता पोथीचे प्रवाचक तथा आलेल्या आचार्यगनांची सवाद्य भव्य शोभायात्रा-श्रीकृष्ण मंदीर मोठा मठ येथून कार्यक्रम स्थळापर्यंत संपन्न होईल. या कार्यक्रमाला ज्यांची पावन उपस्थिती लाभनार आहे ते संत गण पोथीचे प्रवाचक आचार्य प. पु. प. म. श्री सातारकर बाबाजी, कविश्वर कुलाचार्य आचार्यप्रवर प.पु.प.म श्रीदर्यापूरकर बाबाजी, पारीमांडल्य कुलाचार्य आचार्य प्रवर प. पू. च.म. श्रीलासूरकर बाबाजी, आचार्य प्रवर प. म. श्री बाभुळगावकर बाबाजी, आचार्यप्रवर प.म.श्री अशनाख्य बाबाजी, आचार्य प्रवर प. म. श्री. कापुसतळनीकर बाबाजी, आचार्य प्रवर श्री येळमकर बाबाजी, आचार्यप्रवर प. म. श्री मानेकर बाबाजी, आचार्यप्रवर प.म.श्री प्राचार्य राजधरकर बाबाजी, अचार्यप्रवर.प. म. श्री नागांश बाबाजी, , प. म. श्री विश्वनाथ बाबा दर्यापूरकर, प.म.श्री गुर्जर बाबा, प.म.श्री पेंटर मामाजी, प. म. श्री चोरमागे बाबाजी प.म. श्री कान्हेराज बाबाजी, प. म. श्री दीवाकर बाबाजी,प.म श्री सरळ बाबा या सर्व आचार्य मंडळींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन महंत श्री वाघोदेकर शास्त्री मोठा वाघोदा यांनी परीसरालील सर्व भाविकांना उपस्थितीचे आव्हाहन केले आहे.


