ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान प्रशिक्षण आराखडा सन २०२४/२५ आमचा गाव आमचा विकास अंतर्गत प्रशिक्षण व क्षमता बांधणी उपक्रमास मान्यता दिलेली असून त्यानुसार ग्रामपंचायत आराखड्या संबंधी गणस्तरीय कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन गटविकास अधिकारी यांचे मार्फत व नियंत्रणाखाली दिनांक ११/०१/२०२४ वार गुरूवारी ग्रामपंचायत कार्यालय ऐनपुर येथे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.[ads id="ads1"]
या प्रशिक्षणाचे प्रविण प्रशिक्षक भुषण पाटील विस्तार अधिकारी ( ग्रा.पं. ) पंचायत समिती रावेर व पर्यवेक्षिका कल्पना मंगळे हे होते या प्रशिक्षणास गणातील सरपंच,ग्रा.पं.सदस्य आशा स्वयंसेविका,जि.प. मराठी शाळेचे मुख्याध्यापक ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते



