राजोरे येथे अयोध्येवरून आलेल्या मंगल कलशाची वाजत गाजत शोभायात्रा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील )

यावल तालुक्यातील राजोरे या गावी अयोध्या येथून आलेला पवित्र मंगल अक्षदा कलशाची संपूर्ण गावामध्ये वाजत गाजत भव्य शोभा यात्रा काढणाय आली 

या यात्रेत गावातील विठ्ठल महिला भजनी मंडळ व सतपंथ महिला भजनी मंडळ सहभागी झाले होते .महिला व मुलींनी कलश घेऊन सहभाग घेतला, गावातील सर्व जोडप्याला ग्रंथ व कलश घेण्याचा योग्य आला. ही शोभा यात्रा विठ्ठल मंदिर जवड संपली तिथे महाआरती करून समारोप झाला

दि.२२ जानेवारी रोजी संपूर्ण गावकरी याचे कडून दिवाळी  साजरी करण्यात येणार असून गाव पंगत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!