फैजपूर प्रतिनिधी(सलीम पिंजारी)
येथील पोलीस पाटील यांना ग्रामपंचायत कार्यालयात जागा उपलब्ध करण्याबाबत चे निवेदन सादर पोलीस पाटील हे महसूल व पोलीस प्रशासना चे गाव पातळीवरील महत्त्वाचा घटक असून संबंधित विभागांकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशांची पोलीस पाटील यांना अंमलबजावणी करावी लागते.[ads id="ads1"]
पोलीस पाटील यांना ग्रामपंचायत कार्यालयात जागा उपलब्ध करणे बाबत दिनांक 17 डिसेंबर 2012 चा शासन निर्णय असून सुद्धा मात्र अजून याची दखल घेतली गेलेली नाही तरी याबाबत वरिष्ठ पातळीवर पोलीस प्रशासनामार्फत पाठपुरावा करण्यासाठी फैजपुर पोलीस पाटील ग्रुप तर्फे फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. निलेश वाघ यांना निवेदन देण्यात आले . यावेळी फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलीस पाटील उपस्थित होते