ऐनपूर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागामार्फत अंतरिम अर्थसंकल्प 2024 वर चर्चासत्र संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुका प्रतिनिधी  - विनोद हरी कोळी 

  ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथील अर्थशास्त्र विभागातर्फे नुकतेच अंतरिम अर्थसंकल्प 2024 वर चर्चासत्र संपन्न झाले सदर चर्चासत्राचे अध्यक्ष स्थान अर्थशास्त्र विभाग प्रमुख  डॉक्टर नीता एस. वानी  यांनी भूषविले. [ads id="ads1"] 

  सुरुवातीला प्रा. ज्ञानेश्वर कोळी आपल्या मनोगतात अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी स्पष्ट करून  म्हणाले की व्यक्ती आणि सरकार यांच्या दृष्टी कोणातून अर्थसंकल्प कसा असतो असे सांगितले प्रा. व्ही.एच. पाटील  आपल्या मनोगतात म्हटले की बजेटची सुरुवात कशी झाली बजेट ची सुरुवात कुठून झाली व ती मांडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कशा आहे व ती सध्या स्थितीत कशी मांडली जाते याची सविस्तर माहिती सांगितली व त्याचबरोबर कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्र यांची बजेटमध्ये काय भूमिका असते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके त्यांनी विद्यार्थ्यांना नेमकं अर्थसंकल्प काय असतो तो कोणासाठी मांडला जातो आणि ते कोण मांडते आणि कशाप्रकारे मांडते आणि का म्हणते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले पुढे ग्रंथपाल डॉ. एस एस साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे अर्थसंकल्प कसे असते त्याचबरोबर महाविद्यालयाचे आपल्या दैनंदिन जीवनाचे व सरकारचे या सर्वांचा  वोहापोह केला.[ads id="ads2"] 

   शेवटी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात भाग घेऊन अर्थसंकल्प 2024 वरती चांगल्या प्रकारे चर्चा केली व आपली वेगवेगळी मते मांडली. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर नीता एस.वणी यांनी चांगल्या वाईट बाबींची चर्चा करून अंमलबजावणी योग्यरीत्या होणे आवश्यक आहे असे म्हटले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप  तायडे यांनी केले व त्याचबरोबर त्यांनी मनोगत सुद्धा व्यक्त केले व आई ही घराची खरी अर्थ तज्ञ असते असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे आभार प्रा. अक्षय आर. महाजन यांनी मानले त्याचबरोबर अर्थसंकल्पाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे बी अंजने यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!