यावल ( सुरेश पाटील )
दिड ब्रास अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर सुसाट वेगाने पळून जात असताना यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने आज सिनेमा स्टाईल पद्धतीने पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केले.[ads id="ads1"]
शनिवार दि.१७ रोजी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डम्पर क्र. MH 31CQ 7914 तालुक्यातील हिंगोणा येथे पकडून तहसील कार्यालय यावल येथे जमा केले.ही कारवाई यावल तलाठी ईश्वर कोळी,डो.कठोरा येथील तलाठी वसीम तडवी,साकळी तलाठी साकळी मिलिंद कुरकुरे यांनी हे अवैध वाळू वाहतुकीचे डंपर सिनेमा स्टाईल पद्धतीने पाठलाग करून पकडले.[ads id="ads2"]
किरण वसंत बादशह यांच्या मालकीचे वाहन असून त्यात दीड ब्रास रेती हे गौणखनिज आढळून आले असून पंचनामा करून पुढील दंडात्मक कार्यवाही सुरू आहे.
याच प्रकारे यावल शहरात दिवसा किंवा रात्री बे- रात्री, सकाळी महसूल अधिकारी,कर्मचारी दैनंदिन कामकाजात व्यस्त असताना किंवा सकाळी साखर झोपेत असताना, आणि यावल शहरात बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यावर सुद्धा अवैध गौण खनिज वाहतूक सर्रासपणे सुरू आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.