अंत्योदय योजनेअंतर्गत यावल तालुक्यात एकूण १० हजार लाभार्थ्यांना मोफत साडी वाटप कार्यक्रम सुरू ; लाभार्थी महिलांमध्ये मोठा आनंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील )

यावल शहरासह तालुक्यात रास्त भाव धान्य दुकानात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी वाटप सुरू झाल्याने आणि या आधी संपूर्ण तालुक्यात आनंदाचा शिधा सुद्धा वाटप झाल्याने राज्य व केंद्र शासनाच्या या कौतुकास्पद निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुक करण्यात येत आहे.[ads id="ads1"]  

        यावल शहरात गेल्या २ दिवसापासून सुधाकर माहूरकर यांच्या व इतर स्वस्त धान्य दुकानातून अंतोदय रेशन कार्ड धारकांना मोफत साडी वाटप सुरू झाली यावल शहरात रेशन कार्ड लाभार्थ्यांमध्ये विशेषता गरजू महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.[ads id="ads2"]  

         पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने संदर्भातील शासन निर्णय जारी केला होता आणि आहे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

आहे.यावल तालुक्यात अंदाजे १० हजार ६०० अंत्योदय लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.आणि जिल्हा पुरवठा अधिकारी, यावल तहसीलदार सौ.मोहन माला नाझीरकर यांच्या सूचनेनुसार पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक अंकिता वाघमारे गोडाऊन व्यवस्थापक वाय.डी.पाटील यांनी नियोजनबद्धरीत्या अंत्योदय लाभार्थ्यांना मोफत साडी वाटप कार्यक्रम सुरू केला आहे,मोफत साडी वाटप कार्यक्रमात ज्या रेशन दुकानदारांकडून आदेशाचे पालन होणार नाही त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार असल्याचे पुरवठा विभागाकडून समजले या आधी आनंदाच्या शिधा वाटप कार्यक्रमात लाभार्थ्यांना रवा, साखर,तेल,चणाडाळ, पोहे मैदा देण्यात आला.असून याबाबत अंत्योदय योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेच्या माध्यमातून प्रति कुटुंब एका साडीचे मोफत वाटप तालुक्यातील एकूण १२४ धान्य दुकानदार, आपापल्या गावातील संबंधित सरपंच,पोलिस पाटील उपसरपंच ग्रा.पं.सदस्य यांच्या हस्ते या योजनेचा वाटप अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांना करीत असल्याने सर्वत्र महिलांकडून सर्वत्र कौतुक केली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!