रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि.१३. रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक दिनांक १६. शुक्रवार रोजी दुपारी १२.वाजता रावेर येथील नवीन विश्रामगृह (रेस्ट हाऊस) सावदा रोड रावेर येथे वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली असून या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभाताई पाटील जिल्हा सरचिटणीस एड. योगेश तायडे हे या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करणार आहे.[ads id="ads1"]
या बैठकीचे विषय खालील प्रमाणे आहे. १) जि.प., व प.स. गट.गणा मध्ये मीटिंगांचा आयोजन करणे बाबत.२) बुथ कमिटी व सर्कल बांधणे तसेच पक्ष बांधणी.३) नवीन शहर कार्यकारिणी व ग्रामीण शाखा बांधणे.४) गाव तिथे शाखा, घर तेथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता निर्माण करणे.५) वंचित बहुजन आघाडी या पक्षात ओबीसी बांधवांना सन्मानपूर्वक महत्त्वाचे पदे देण्याबाबत.६) जे पदाधिकारी पक्षाला वेळ देऊ शकत नाही. पक्षाचे काम करत नाही अशा पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना मानाचे स्थान देण्यात येईल. [ads id="ads2"] अशा विविध विषयांवरती चर्चा करण्यात येणार असून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी व रावेर तालुका कार्यकारणीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका सरचिटणीस कांतीलाल गाढे, शेख याकूब शेख निसार, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकळे, सलीम शहा, अर्जुन वाघ, ज्ञानेश्वर तायडे, संजय कोचुरे, राजेंद्र अवसरमल, कैलास तायडे, अरविंद गाढे, कंदरसिंग बारेला, कैलास वैदकर, अजय तायडे, राहुल गाढे, प्रकाश तायडे, दौलत अडांगळे, शेख इमरान,महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. सुजाता कोचुरे, ता. सरचिटणीस सौ.ललिता कोचुरे, सौ.पूजा गाढे. सौ कविता कोचुरे, सौ नेहा कचरे, सौ.अलका तायडे. इत्यादींनी प्रसिद्ध दिले आहे.



