वंचित बहुजन महिला आघाडीची पाडळे खुर्द येथे बैठक उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि.25. रावेर तालुक्यातील पाडळे खुर्द येथे वंचित बहुजन महिला आघाडी या पक्षाची दि.24. शनिवार रोजी सायंकाळी 5. वाजता वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षा सौ. सुजाताताई कोचुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, ता. उपाध्यक्ष सलीम शहा यासीन शहा, संजय कोचुरे हे उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे महिलांना मार्गदर्शन करत असताना म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांचा असून ते अहोरात्र वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढत असून महिलांनी यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मतदान करायचे आहे कारण वंचितांचा खरा नेता जो कोणी असेल तर ते श्रद्धेय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर आहे. आणि इथल्या तळागाळातील वंचित लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे. म्हणून महिलांनी संघटन करून वंचित बहुजन आघाडी या पक्षा मध्ये जास्तीत जास्त सहभागी होणे आज काळाची गरज आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे म्हणाले.

महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाल्या की आज या देशांमध्ये महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहे. हे आपण सर्व महिलाना माहित आहे. ज्यांना पक्षाला मतदान केले ते आजही महिलांना संरक्षण देऊ शकत नाही म्हणून महिलांनी आता सावधान झाले पाहिजे. आणि या देशात एकमेव पक्ष असा आहे की इथल्या तमाम वंचित समूहाला सोबत घेऊन काम करत असेल तर तो पक्ष वंचित बहुजन आघाडी हा आहे. आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आहे. जसे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले आणि संविधानाच्या माध्यमातून महिलांना अधिकार दिले. परंतु इथले जातीवादी पक्ष आजही महिलांना  समजून त्यांच्या न्याय हक्कापासून त्यांना वंचित ठेवत आहे. तर आपल्याला वंचित बहुजन आघाडी या पक्षालाच मदत करावे लागेल आणि मतदान करावे लागेल अन्यथा तुम्हाला कोणताही पक्ष वाचवू शकणार नाही. आज या देशांमध्ये जातीवादी पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठे संविधान भारत देशाला दिले असून आणि ते संविधान बदलविण्याचा  काम इथले जातीवादी पक्ष करीत आहे. म्हणून महिलांना आम्ही त्यांच्या अधिकार आणि हक्क हे समजून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करण्याचे काम करीत आहे. अशा त्या अध्यक्ष भाषणामध्ये म्हणाल्या. या बैठकीला प्रीती पाटील, मंगला भालेराव, सरुबाई भिल, वच्छला माळी, अयनूर तडवी, गिरजाबाई भिल, उशाबाई भिल, मैनाबाई तडवी , उषाबाई चौधरी, पल्लवी कोळी, चमेलाबाई पाटील, सुभद्राबाई महाजन. दौलत अडांगळे, शेख इमरान, अरुण महाजन, संतोष कोळी, असे बहुसंख्य महिला पुरुष या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन संजय कोचुरे यांनी केले तर आभार सलीम शहा यांनी मांडले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!