यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदचा मोर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल- फिरोज तडवी

 प्रतिनिधी | यावल पंचायत समिती ते आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शिष्ट पद्धतीत पाई घोषणा देत मोर्चा काढला ,भुमिहीन दारिद्रयरेषेखालील आदिवासींना शासनाच्या सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या जमिनी बाबत शेतकऱ्यांनी जमीन विक्री प्रस्ताव एकात्मिक आदिवासी व प्रकल्प विकास कार्यालयास सादर केलेले असुन , त्या जमिनी तात्काळ खरेदी करून आदिवासींना वितरित करण्यात यावी तसेच आदिवासी विभागाकडून दिनांक २ / o८ / २o२२ रोजीच्या पत्र क्रमांक प्र . क्र ./का७ ( ३ ) यावल २०९९ अन्वये जिल्ह्यातील शासकीय महामंडळाच्या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या व वापरात नसलेल्या जमिनी तसेच ५ वर्षानंतर एखाद्या कार्यासाठी संपादीत केलेल्या जमिनी वापर विना परत करण्यात आलेल्या आहेत. [ads id="ads1"]  

अशा जमिनी देखिल सदर योजने अतर्गत आणुन त्या वितरीत करण्यात याव्यात यासह आदिवासी बांधनांच्या निगडीत विविध समस्या व आदी मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषद भारत या संघटनेच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोठया संख्येत आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काडुन प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, दरम्यान प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांची आदिवासी एकता परिषदचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनिल गायकवाड यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनको, संघटनेचे जिल्हा प्रधान यशवंत अहिरे ,संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी पवार ,जिल्हा सचिव भगवान मोरे, जिल्हा सहसचिव मुकेश वाघ ,महेन्द्र मोरे , सदु भिल ,राजु गायकवाड,भुरा भिल यांच्या शिष्ठमंडळाने भेट घेवुन आदिवासी बांधवांसाठी मिळणाऱ्या विविध प्रलंबीत योजनांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून योजनांची अमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली. [ads id="ads2"]   

  दरम्यान प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी शिष्टमंडळास त्यांनी केलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत शासनाच्या माध्यमातुन तात्काळ आपल्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लिखित आश्वासन दिले आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!