डोंगरकठोरा शिवारातून आडजात लाकडाची तस्करी कारवाई गुलदस्त्यात..?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली जात नसल्याने वन विभागाच्या कारवाईबाबत संशय..?

यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

जळगाव वन विभाग कार्यक्षेत्रात म्हणजे यावल तालुक्यातील यावल पूर्व वन विभाग क्षेत्रात डोंगरकठोरा शिवारात आडजात लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.लाकूड व्यावसायिका यांच्या विरुद्ध कारवाई होते किंवा नाही..? याबाबतची माहिती मात्र वन विभागाकडून मिळत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संशय व्यक्त करण्यात येत आहे. [ads id="ads1"] 

        याबाबतची सविस्तर माहिती अशी की यावल पूर्व वन क्षेत्रात डोंगर कठोरा शिवारात मिळालेल्या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व व डोंगरकठोरा राउंड स्टाफ सह डोंगरकठोरा ते हिगोंणा रस्त्यांनी गस्त करीत असताना अवैध निंब,करंज,सुबाभूळ [ads id="ads2"] 

जळाऊ लाकूड वाहतूक करणारे स्वराज ट्रॅक्टर वाहन क्रमांक एम.एच.२९एम ४९८४.ताब्यात घेतल्याचे समजले.परंतु याबाबत वन विभागाकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती न दिल्याने यावल पूर्व व पश्चिम विभागात वन विभाग कारवाई बाबत संशय व्यक्त केला जात आहे. अंदाजे जळाऊ ६.३०० घ.मी किमंत ७३७१=०० रु वाहन १,७५,०००=००रु एकुन १,८२,३७१=००रु प्र.री.०१/२०२४ दि.८/०३/२०२४ चा आगार रक्षक यावल यांनी गुन्हा नोंद केला व वाहन व मुद्देमाल सह मुख्य विक्री केंद्र यावल येथे जमा केले. पुढील तपास वनपरिमंडळ अधिकारी डोंगरकठोरा यांचा चालु आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!