"सावदा विज वितरण सह पालिकाकडे नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी"सोहेल खान
-----------------------
या कुपनलिकेस प्रशासकीय काळात मंजुरी मिळाली असून,याचे खेदकामाची सुरुवात करित असताना त्या माजी नगरसेवकांनी हातात नारळ घेऊन केविलवाणीपणे(राजकीय श्रेय)का घेतले?याचे अधिकृत उत्तर ते जाहीरपणे देतील का? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. [ads id="ads1"]
--------------------------------------------------------
सावदा ता.रावेर वार्ताहर युसूफ शाह
सावदा :- येथील नगरपालिका हद्दीतील गौसियानगर,बिलाल नगर,जिलानी नगर इत्यादी रहिवासी भागात अनेक वर्षांपासून दर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होत होती.तरी येथील टंचाईग्रस्त लोकांच्या मागणीवरून तथा प्रशासकिय स्तरावर पाणी टंचाई बाबत एप्रिल २०२३ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांनी आयोजित केलेल्या बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार येथील पालिकेचे मुख्याधिकारी यांनी स्थळनिश्चिती करून प्रशासकीय काळात मे २०२३ मध्ये ठराव मंजूर करून गौसियानगर मधील ओपन स्पेच येथे फेब्रुवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात सदरील कुपनलिका १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करून दिली. [ads id="ads2"]
पंरतू विज डीपी आभावी या कुपनलिकेचा लाभ येथील सर्व टंचाईग्रस्त रहिवासीयांना मिळणार नसल्याची माहिती समजली असता,ही कुपनलिकेचा लाभ लवकरात लवकर गौसियानगर सह लोकांना या उन्हाळ्यात व्हावे.तरी याठिकाणी तातडीने नविन विज डिपी लावण्यात यावी.अन्यथा उपोषण करण्यात येईल.असी मागणी एका निवेदनाद्वारे दि.११ मार्च रोजी समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान सह शिवसेना शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी,महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यचे रोवेर तालुका उपाध्यक्ष युसूफ शाह,शहर अध्यक्ष फरीद शेख,शेख निसार अहमद,सादीक मिस्तरी,शेख कमरोद्दीन यांनी सावदा विज वितरण अभियंता हेमंत चौधरी व पालिकेचे मुख्याधिकारी भुषण वर्मा यांच्याकडे केली असून,हा विषय जलदगतीने मार्गी कसा लागेल यासंदर्भात आज रोजी पालिकेत सदरील दोघे अधिकारी सह निवेदन देणार यांची संयुक्त बैठक देखील झाली.तसेच या बाबत मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे देखील निवेदन देण्यात येईल.



