रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 20 मार्च 2024 बुधवार रोजी श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर येथील भूगोल विभागातील टी.वाय.बी. ए. मधील विद्यार्थ्यांचा चा निरोप समारंभ मा.प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल सर यांचे मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आला. यावेळी भूगोल विभाग प्रमुख प्रा. सी.पी. गाढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी निरोप म्हणजे शेवट नसून उद्याच्या वाटचालीची सुरुवात आहे. स्पर्धात्मक युगामध्ये प्रवास करताना विद्यार्थ्यांनी शिस्त, अनुशासन, चिकाटी, नैतिकता याचे पालन करून उत्तम नागरिक बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली. [ads id="ads1"]
तसेच टी.वाय. बी.ए.च्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जी. आर. ढेंबरे यांनी विद्यार्थ्यांना सहनशीलता अंगी बाळगून स्वतःची प्रगती करावी यावर मार्गदर्शन केले. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. नीता जाधव यांनी विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपट करावी यावर मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. स्वाती राजकुंडल यांनी विभागाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करत या आठवणीच्या शिदोरी भविष्यामध्ये जीवन जगत असताना खूप उपयोगी ठरतात असा अनमोल सल्ला दिला. प्रा. डॉ.एम.डी. तायडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगामध्ये जगत असताना कशाप्रकारे अध्ययन कौशल्य अंगी बाळगावी यावर मार्गदर्शन केले. तसेच प्रा. एल .एम. वळवी व प्रा. डी. वाय. महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. [ads id="ads2"]
यावेळी भूगोल विभागातील एस. वाय.बी. ए. च्या विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प व पेन देऊन टी.वाय.बी. ए. च्या विद्यार्थ्यांना निरोप दिला. तसेच भीमराव हिवरे, सानिया तडवी, रोहित कोळी, श्वेता ठाकणे,रोहित वानखेडे या विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षल पाटील ने केले तर सूत्रसंचालन साक्षी पाटील व मानसी जोशी यांनी केले. भूगोल मंडळ अध्यक्ष तस्लिम तडवी यांनी शेवटी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल झोपे,भारती झोपे, शिवम तायडे,रोहित कोळी, अनमोलिका गाढे, प्रथमेश चौधरी, निखिल पाटील, जयेश पाटील,रोहित खैरे,तेजस्विनी पाटील,वर्षा पाटील, खुशबू कोळी,काजल सावळे, अजय गाढे, अंकुश निकम, नरेंद्र लहासे, प्रशिक पवार, शुभम कोचुरे या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. यावेळी भूगोल विभागातील बहुसंख्य विद्यार्थी हजर होते.




