यावल तालुक्यात भारतीय जनता पार्टी मधील पदाधिकारी कार्यकर्त्यांचे राजीनामा नाट्य ? खासदार निधीतून विविध कामे घेऊन राजीनामे कशासाठी..?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


विशेष प्रतिनिधी (सुरेश पाटील) : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून  विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर होता बरोबर खासदार रक्षाताई खडसे यांच्या खास विश्वासातीलच आणि समर्थक  काही पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांमधून संतप्त भावना आणि नाराजीचा सूर निघाला. विशेष म्हणजे यातील काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खासदार निधीतील विविध कामे आपल्या सोयीनुसार केलेली आहेत. [ads id="ads1"] 

  त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे ठराविक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी काल काल दि. 13 रोजी रात्रीच भालोद गाव गाठून गावात भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपा पक्षश्रेष्ठींबाबत आपली नाराजी व्यक्त करून त्यांच्याकडे सामूहिकरित्या राजीनामा देण्याच्या नाट्यमय हालचाली केल्याने या नाट्यमय कृत्यामुळे संपूर्ण यावल रावेर तालुक्यात राजकारणात आणि प्रश्न उपस्थित केले जात असून याबाबत राजकीय वर्तुळात  मोठी खळबळ उडाली. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी   नाराजी प्रकट करतांना पक्षाकडून सातत्याने जावळे कुटुंबावर अन्याय होत असल्याचे सुद्धा अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.पुर्वी स्व.हरिभाऊ जावळे यांच्या संदर्भात जे झालं होत तेच अमोल जावळे संदर्भात झाल्याचा सुर निघाला.  [ads id="ads2"] 

  तसेच अशा राजकीय पक्षात पक्षात काम करून काय फायदा..? असे  बोलून काही पदाधिकारी कार्यकर्ते आपला संताप व्यक्त करीत होते आणि आहेत सायंकाळ नंतर भाजपाच्या अनेक सोशल मीडिया ग्रुप मध्ये पक्षाच्या भूमिकेबाबत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपला रोष मनसोक्त पणे व्यक्त केला.

      काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामूहिक रित्या आपले राजीनामे भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्याकडे सादर केल्याचे सुद्धा पक्षातच बोलले जात असून आपला संताप व्यक्त केला याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी,किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू, भाजपा शहर आघाडी जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, भाजपा ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष हर्षल पाटील, फैजपुर माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, व्यंकटेश बारी यासह भाजपाचे जेष्ठ व युवा सह विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे परंतु याबाबत यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांना भ्रमणध्वरीवरून संपर्क साधून विचारले असता पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहे किंवा नाही..? याबाबत मला माहिती नाही असे त्यांनी सांगितले.

        भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल दादा जावळे यांच्याशी आज गुरुवार दि.१४ रोजी संध्याकाळी १८ वाजेच्या सुमारास भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहे किंवा नाही याबाबत आणि त्यांची नेमकी भूमिका आता काय राहणार..? याबाबत माहिती मिळाली नाही.

        खासदार रक्षाताई खडसे यांनी गेल्या १० वर्षात रावेर लोकसभा मतदारसंघासह यावल तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या मागणीनुसार विविध कामे केली आणि काही कामे इतर ठेकेदारांच्या नावावर स्वतः काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तेही आपल्या सोयीनुसार करून सुद्धा आपल्याच पक्षाच्या खासदारांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाराजीचा प्रश्न का आणि कशाकरता उपस्थित केला.. गेला ?  तसेच भारतीय जनता पार्टी पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट पदाधिकारी कार्यकर्त्यांना माहीत नाही का…? असा प्रश्न सुद्धा राजकारणात उपस्थित केला जात असून पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या या राजीनामा 

नाट्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

       तसेच रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाची उमेदवारी निश्चित झाल्याने यासोबत आता रावेर विधानसभा मतदारसंघाचे राजकीय गणित सुद्धा लोकांच्या डोळ्यासमोर आले असून विधानसभा भावी उमेदवाराबाबत सर्वांचे लक्ष केंद्रित झाले असून भावी उमेदवार आणि सर्व स्तरातील समाज बांधव रक्षाताई खडसे यांना कोण कोणत्या माध्यमातून राजकीय खेळी खेळून कसे सहकार्य करतील..? याकडे सुद्धा संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष वेधून आहे.

      राजकारणात काही राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आता नागरिकांना आणि प्रसिद्धी माध्यमांना महत्व न देता आपल्या राजकीय स्तरावरून व्हाट्सअप,फेसबुक,इंस्टाग्राम इत्यादी माध्यमातून आपल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून आपल्या पक्षाची आपल्या सोयीनुसार कामे व कामकाज करून घेत आहे त्यामुळे त्यांचा सरळ संपर्क आता नागरिकांशी आणि प्रसिद्धी माध्यमांशी येत नसल्याने मतदारांशी, सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा संपर्क कमी होत असल्याचे सुद्धा सुज्ञ नागरिकांमध्ये राजकारणात बोलले जात आहे.याचे स्पष्ट उदाहरण द्यायचे झाल्यास नुकत्याच काही सहकारी संस्थांच्या निवडणुका यावल रावेर तालुक्यात झाल्या त्यावेळेला प्रसिद्धी माध्यमांना ५ टक्के सुद्धा विश्वासात घेतले गेले नसल्याचे संपूर्ण लोकसभा विधानसभा क्षेत्रात बोलले जात आहे.काही राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपल्या कामाचा वाजवीपेक्षा जास्त आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स झाला असल्याने राजकारणात यापुढे सुद्धा असे राजकीय परिणाम नागरिकांना दिसल्या शिवाय राहणार नाही असे सुद्धा बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!