यावल ( सुरेश पाटील ) आज दि. ७ रोजी सकाळी येथील व्यास मंदिरा जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडले असले तरी आता उद्या दि. ८ पासून लागोपाठ ३ दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांना एक सुवर्णयोग प्राप्त झाला आहे. [ads id="ads1"]
महसूल पथकाने दिलेली माहिती अशी की आज सकाळी व्यास मंदिराच्या मागे ट्रॅक्टर क्र.MH 19- BG 5149 वरील चालक श्याम दिलीप तायडे ( ट्रॅक्टर मालक- साहेबराव उत्तम सोनवणे ) हा अनधिकृत पणे गौणखणी याची वाहतूक करीत असताना पकडला असून वाहनांमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली आहे सदर गौण खनिजाची बाजारभावाने अंदाजे किंमत 3500 इतकी होईल वाहन चालकाकडे चौकशी केली असता गौण खनिज वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही अशी माहिती मंडळ अधिकारी यांनी दिली.वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडण्याची कार्यवाही साकळी मंडळ अधिकारी,तसेच साकळी व मनवेल येथील तलाठी व इतर कर्मचाऱ्यांनी केली. [ads id="ads2"]
उद्या शुक्रवार दि. ८ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त तसेच शनिवार रविवार अशा सलग तीन दिवस शासकीय सुट्या आल्याने गौण खनिज वाहतूकदारांना एक सुवर्णयोग प्राप्त झाला आहे त्यात महसूल विभाग काय कार्यवाही करणार..? तसेच तलाठी सर्कल महसूल पथक बाहेरगावी जाणार आहेत किंवा कसे याबाबतची पाळत सुद्धा त्यांच्यावर राहणार आहे.
यावल तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागात गौण खनिज वाहतूक करताना वाहनधारक आपल्या गौण खनिज वाहनावर ताडपत्री / फट टाकून गौण खनिज वाहतूक करीत नसल्याने वाळू, माती,बारीक खडी मधील धूळ हवेने उडून नागरिकांच्या डोळ्यात जात असल्याने, रस्त्यावर पडत असल्याने इतर वाहनधारकांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सुद्धा प्रांताधिकारी यावल तहसीलदार यांनी गौण खनिज वाहतूक परवाना देताना महत्त्वाच्या सूचना अटी शर्ती लेखी स्वरूपात द्याव्या अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.