यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील मारूळ येथे अनेकांनी बोगस रेशन कार्ड तयार केले असून त्या ठिकाणी बोगस रेशनकार्ड वर स्वस्त धान्याची उचल सुद्धा झाली असल्याने चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी मारूळ येथील राजू रमजान तडवी यांनी यावल तहसीलदार यांच्याकडे केली आहे. [ads id="ads1"]
दि. ६ मार्च २०२४ रोजी यावल तहसील कार्यालयात दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की,
मारूळ येथे रेशन दुकानदाराकडे रेशनकार्ड जे दिले आहे त्यापैकी काही रेशन कार्ड हे अपात्र लाभार्थ्यांचे असल्याने त्यांना स्वस्त धान्य दिले जात आहे किंवा नाही. यांची चौकशी करावी तसेच रेशन दुकानातून पात्र अशा गरीब लाभार्थींना रेशनधान्य पासून वंचित राहावे लागत आहे,तरी रेशन दुकानातील संपुर्ण दप्तरची चौकशी करून दरमहा रेशन दुकानदार किती माल उचल करतो आणि कोणाकोणाला रेशन धान्य वितरित करितो यासह यासोबत दिलेल्या १३८ रेशनकार्ड धारक यादीची चौकशी करून पुढील कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. [ads id="ads2"]
मारूळ येथील संबंधित रेशनदुकानदार असे म्हणतो की मी कोणाला घाबरात नाही तुम्ही जिल्हाधिकारी,विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी,यावल तहसिलदार किव्वा कोणा कडेही जा कोणीही माझेवर कार्यवाही करणार नाही.तसेच काही पात्र गरीब लोक धान्य मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यांना धान्य मिळणेबाबत कार्यवाही करावी.यावल पुरवठा विभागात फेऱ्या मारून मारून काही लोक मयत झाले परंतु त्यांना रेशन धान्य मालाचा लाभ मिळाला नाही.आता जे जिवंत गरजू नागरिक आहे ते धान्य मिळण्यासाठी ते यावल तहसील कार्यालयात पुरवठा विभागात सतत फेऱ्या मारीत आहेत ते पात्र असल्यास त्यांना लाभ मिळवा अशी मागणी राजू रमजान तडवी यांनी केल्याने यावंल तहसीलदार आपल्या पुरवठा विभागामार्फत चौकशी कार्यवाही करून मारूळ येथील गरजू पात्र लाभार्थ्यांना रेशन धान्य देण्याबाबत ठोस निर्णय घेतील.



