आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक यू.एस.धोटे सेवेतून निलंबित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  ( सुरेश पाटील )

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक धोटे यू.एस. यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरात मोठी चळवळ उडाली.[ads id="ads1"]  

       मिनल करनवाल,भा.प्र. से.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दि.२८ मार्च २०२४ रोजी दिलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ ची आदर्श आचारसंहिता दि.१६ मार्च २०२४ नुसार जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता दिनांक 16 3 2014 पासून लागू झालेली असून गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांच्या अहवालानुसार नायगाव ( जिल्हा नांदेड ) पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक धोटे यु.एस.यांनी व्हाट्सअप व्दारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे उल्लघंन केले आहे. यावरुन धोटे यु.एस.वरिष्ठ सहाय्यक हे महाराष्ट्र. जिल्हा परिषद,जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील कलम ३ व ४ चा भंग केल्याचे स्पष्ट होते.त्याअर्थ महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा   ( शिस्त व अपील ) नियम १९६४ मधील तरतुदीनसार नायगाव पंचायत समिती वरिष्ठ सहाय्य धोटे यु. एस. वरिष्ठ यांना आदेश निर्गमनापासुन म्हणजे २८ मार्च २०२४ पासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येत आहे.निलंबन काळात संबधिताचे मुख्यालय पंचायत समिती माहुर हे राहील.[ads id="ads2"]  

        महाराष्ट्र नागरी सेवा ( स्वियेत्तर सेवा, निलंबन, बडतर्फी यांच्या काळातील प्रदाने ) नियम १९८१ चे नियम

६८ (एक) (ए) प्रमाणे अर्धवेतनी रजेवर असतांना जेवढे वेतन व भत्ते मिळत होते तेवढा निलंबन भत्ता अनुज्ञेय

राहील.निलंबन काळात कोणताही खाजगी व्यवसाय संबधीतास करता येणार नाही तसे निर्देशनास आल्यास

त्यांच्या विरुध्द नियमाप्रमाणे वेगळी शिस्तभंगाची कार्यवाही करण्यांत येईल. असे सुद्धा दिलेल्या आदेशात नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी म्हटले आहे.

        दिलेल्या आदेशाच्या प्रति माहितीस्तव नांदेड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड, नांदेड जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी, नायगाव / माहूर पंचायत समिती गट विकास अधिकारी व संबंधितांना दिल्या आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!