यावल ( सुरेश पाटील )
तालुक्यातील महेलखेडी येथे माजी पंचायत समिती सभापती शोभा विलास पाटील यांच्या खळ्याला आज गुरुवार दि.२८ मार्च २०२४ रोजी दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच खळबळ उडाली.[ads id="ads1"]
मार्च महिना अखेर तपमान वाढत असल्याने ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे, आग एव्हढी भयंकर होती की गावातील नागरीक मोठ्या संख्येने धाऊन आले हातात येईल त्या वस्तूने पाण्याच्या भांड्याने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिस पाटील यांनी तत्काळ अग्निशामक दलाला कॉल केला असता यावल नगर परिषदेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी हजर झाला.[ads id="ads2"]
नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले,शेती उपयोगी वस्तू व गुरा ढोरांनचा चारा जळून खाक झाला आहे,सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नसून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यावेळी संपूर्ण ग्रामस्थ प्रतिष्ठीत व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.