ऐनपूर महाविद्यालयात “रासायनिक विज्ञानातील संशोधन पद्धती” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



ऐनपूर- येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे “रासायनिक विज्ञानातील संशोधन पद्धती” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  [ads id="ads1"] 

  सदर कार्यशाळेच्या आयोजनासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचाकडून अर्थसाहाय्य मिळाले होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमास व्यासपीठावर श्री. रामदास नारायण महाजन, प्रा. डॉ. विकास व्ही. गीते, प्रा. डॉ. हरीश आर. तळेले, प्रा. जी. पी. वाघुळदे, प्रा. डॉ. गणेश चौधरी, प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने आणि डॉ. सतीश . एन. वैष्णव उपस्थित होते. सुरवातीला लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.  [ads id="ads2"] 

  उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. रामदास नारायण महाजन, उपाध्यक्ष, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ यांनी भूषविले तर उद्घाटन प्रा. डॉ. विकास व्ही. गीते, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कार्यशाळेचे संयोजक डॉ. एस. एन. वैष्णव यांनी सदर कार्यशाळेत एम. एसी च्या विद्यार्थ्याची तसेच संशोधकांची संशोधनाशी ओळख होईल. संशोधना सुरु करतांना त्यांच्या मनात येणाऱ्या विविध शंकांचे निरसन होईल असे मत मांडले. प्रमुख मार्गदर्शकाचा परिचय डॉ. जयंत नेहेते यांनी करून दिला. प्रथम सत्रात प्रा. डॉ. विकास व्ही. गीते, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी “रीसर्च मँन्युस्क्रिप्ट अँन्ड रीसर्च पेपर रायटिंग” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपार व्याख्यानात विद्यार्थ्यांना संशोधनाच्या विषयाची निवड कशी करावी, संशोधनांती मिळालेले रिझल्ट प्रबंधामध्ये कशा पद्धतिने सादर करायचे हे सांगितले. द्वितीय सत्रात प्रा. डॉ. हरीश आर. तळेले, रसायनशास्त्र विभाग, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांनी लिटरेचर सर्वे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपार व्याख्यानात संशोधन कार्य सुरु करण्यापूर्वी लिटरेचर सर्वे कोणत्या पद्धतीचा वापर करावा हे विस्तृतपणे सांगितले. तसेच लिटरेचर सर्वे करण्यासाठी उपलब्ध स्त्रोतांविषयी माहिती दिली. सदर कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. सदर कार्यशाळा विद्यार्थ्यामध्ये संशोधक वृत्ती वाढीस नक्कीच फायदेशीर ठरेल तसेच अशा कार्यक्रमांचे आयोजन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी साठी महत्वाचे पाऊल ठरेल असे मत त्यांनी अध्यक्षीय समारोपात मांडले. प्रा. डॉ. गणेश चौधरी, अभ्यास मंडळ सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिपक पाटील तर आभार प्रदर्शन सहसंयोजक डॉ. जयंत नेहेते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे संयोजक डॉ. एस. एन. वैष्णव, सहसंयोजक डॉ. जयंत नेहेते, सेक्रेटरी डॉ. दिपक पाटील व प्रा. एस. आर. इंगळे तसेच प्रा. संकेत चौधरी, प्रा. केतन बारी, प्रा. काजल महाजन, श्री. नितीन महाजन तसेच सर्व प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!