एका ध्येयवेड्या शिक्षकाची सेवानिवृत्ती : सरस्वती विद्या मंदिरातील चव्हाण सर सेवानिवृत्त

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सेवानिवृत्तीनंतर गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणार...

यावल ( सुरेश पाटील ) येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अरुण डिगंबर चव्हाण हे विज्ञान व गणित शिक्षक सेवानिवृत्त होत आहे.त्यांनी हालाखीच्या परिस्थितीत शेतमजुरी करत स्वतःचे शिक्षण पुर्ण केल्यावर विविध ठिकाणी नोकऱ्या करत शिक्षकीपेक्षात स्थिरावलेल्या पण आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ध्येयवेड्या चव्हाण सरांचा प्रवास विलक्षण आहे.[ads id="ads1"]  

धुळे जिल्ह्यातील शाहादा तालुक्यातील मंदाणे हे त्यांचे छोटेसे गाव. वडिल उत्कृष्ट शिवणकाम करायचे. दोन काका देखील तोच व्यवसाय करायचे. वडिलांनी तर काही वर्ष पुण्याला खडकी येथे सैनिकांचे गणवेश शिकवण्याचे काम केले. नंतर ते गावी आले. अरुण चव्हाण सर शाळा शिकतांना घरी थोडीफार मदत व्हावी म्हणून शेतमजुरी करीत. विशेषतः सुट्टी असेल त्यावेळी ही कामे केली जात असत. असे असुनही अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. पुढे रसायनशास्त्र विषयात बी. एस्सी केले. व नंतर बी. एड. पुर्ण केले. मात्र लगेच शिक्षकाची नोकरी मिळु शकली नाही. पैश्याची गरज असल्याने दुसऱ्या नोकऱ्या शोधणे सुरु झाले. दोंडाईचा, पुणे, शाहादा आदी ठिकाणी विविध कंपन्यान मध्ये सुमारे पाच वर्ष काम केल्यानंतर यावल येथील व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक म्हणून नोकरी करण्याची संधी १९९९ या वर्षी मिळाली. [ads id="ads2"]  

  एका विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. गणितातील बारकावे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात त्यांचा कटाक्ष असायचा. पिरेड व्यतिरिक्त विद्यार्थी शंका समाधानासाठी स्टाफ रुम मध्ये येऊन त्यांच्याशी चर्चा करायचे. सुमारे २२ वर्षे दहावीच्या सेमी इंग्रजी गणित विषयाचे जादा तासाचे क्लास १५ एप्रिल ते ३० मे या कालावधीत त्यांनी घेतले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची फी न घेता हे क्लास घेतले.

सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तत्पर राहुन, कृतीशीलता जोपासली .शालेय कोणत्याही विज्ञान-गणित कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेवून सहकारी विज्ञान शिक्षकांच्या मदतीने कार्यक्रम सुनियोजीत पद्धतीने साजरा केले. शालेय वेळापत्रक (तासिका), परिक्षा बैठक व्यवस्था नियोजन अचुक करून मोलाचे कार्य सतत 26 वर्ष केले त्यांनी अध्यापनात गणित व विज्ञान हे विषय ८वी, ९वी व १० वी सेमी व मराठी अशा दोन्ही माध्यमांना शिकवले. बुलेटीन (जादा) तासांना अभ्यासक्रमातील कोणत्या भागावर जनरल ज्ञान प्रश्न असतात त्यांचे ही मार्गदर्शन केले. या व्यतिरिक्त तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून देखील काम केले.

अश्या या ध्येयवेड्या शिक्षक सुमारे २६ वर्षाच्या सेवेतुन निवृत्त होत आहे. त्यांचा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

      गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन- आता सेवानिवृत्त झालो असल्याने यापुढे वैयक्तिकरित्या समाजातील गरीब,गरजू विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयासह इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती चव्हाण सर यांनी दिली.

         सरस्वती विद्या मंदिरात बौद्धिक स्पर्धा - व्यास प्रासादिक एज्युकेशन संस्थेने तथा संस्थापक देशपांडे कुटुंबीयांनी आतापर्यंत सरस्वती विद्या मंदिरात शिक्षक भरती करताना इतर काही ठराविक नावाजलेल्या प्रसिद्ध विद्यालयाप्रमाणे आर्थिक स्पर्धेला महत्व न देता बौद्धिक स्पर्धेला व शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देऊन कर्तव्यदक्ष अशा शिक्षकांची नियुक्ती तथा भरती केली आहे त्यामुळे सरस्वती विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा आजही कौतुकास्पद आहे असा एक महत्त्वाचा सूर आज चव्हाण सर यांना निरोप देताना उपस्थित शिक्षक वर्गातून निघाला.

रमणदादा देशपांडे यांचा सत्कार- अरुण चव्हाण सर यांनी आज रविवार दि.३१ मार्च २०२४ रोजी तिरुपतीनगर मधील आपल्या निवासस्थानी आयोजित छोटेखानी सेवापूर्ती सत्कार समारंभात व्यास 

प्रासादिक एज्युकेशन मंडळाचे अध्यक्ष रमणदादा देशपांडे यांचा सपत्नीसह सत्कार केला. यावेळी सरस्वती विद्या मंदिरातील व शिक्षण क्षेत्रातील आजी-माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहून अरुण चव्हाण सर यांच्या कौटुंबिक, शैक्षणिक संस्कारांचे व त्यांच्या यशस्वी कर्तव्याचे कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!