अंकलेश्वर ब-हानपुर महामार्गावरील सावदा पोलिस चौकी मोजतेय अखेरची घटका

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील सुकी नदीजवळील पोलिस चौकीची अतिशय दूरावस्था झाली असून              झाडाझुडुपांचा विळख्यात चौकीचे खिडक्या दरवाजा ही गेलीय चोरीस

        रावेर तालुका प्रतिनिधी- मुबारक तडवी        रावेर तालुक्यातील सावदा  पोलिस स्थानक हद्दीतील अंकलेश्वर बुर्हानपुर महामार्गावर मोठा वाघोदा ते वडगाव दरम्यान सुकीनदी चे पुलाजवळील पोलिस चौकीची अतिशय दुरावस्था झालेली आहे एकेकाळी रात्रंदिवस नाकाबंदी चेकपोस्ट  पोलीस चौकी नेहमीच पोलीस कर्मचाऱ्यांच्या  वाहनांच्या चहलपहल मध्ये असणारी सुकी नदी पोलीस चौकी आज वीराण झालेली आहे.[ads id="ads1"]  

   सावदा पोलिस स्टेशनचे २० वर्षा पूर्वी चे तत्कालीन  सहायक पोलिस निरीक्षक यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित टिकून राहण्यासाठी तसेच वाहनांची वेग गती नियंत्रित ठेवण्यासाठी  तसेच अवैध प्रवासी वाहतूक अवैध गुरेढोरेनिर्दयीपणे वाहतूक, अवैध दारू, गुटखा अंमली पदार्थांच्या वाहतुकीला अंकुश राखण्यासाठी सुकी नदीपात्रातील मृदा वाळूचोरी तस्करी बंदोबस्तकामी तपासणी नाका  करीता सुकीनदी पोलीस चौकी बांधण्यात आली होती पोलीस चौकी परिसरात सुशोभीकरण फुलांची झाडे विद्युत खांब उभेकरुन लाईट दिवाबत्तीची व्यवस्था केलेली होती मात्र आजघडीला या पोलिस चौकी ची दयनीय अवस्था झालेली आहे व चौकी शेवटची घटका मोजतेय पोलीस चौकी वास्तूची दुरावस्था झालेली आहे एका मुख्य दरवाजासह दोन्ही खिडक्या चोरीला गेलेल्या आहेत भिंतींची पडकी अवस्था झालेली आहे आणि पोलिस चौकी उध्वस्त होण्याचे मार्गावर आहे व सावदा पोलिस स्टेशनंने दुर्लक्षित पणामुळे च या पोलिस चौकीचे खंडरात रूपांतर झाले आहे.[ads id="ads2"]  

 जिल्हाभरात लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जळगांव जिल्ह्यातील अनेक पोलिस स्टेशनचे अंतर्गत नाकाबंदी चेकपोस्ट लागले आहेत व आचारसंहिता चे काटेकोरपणे पालन करुन रोख रकमेसह अवैध दारू गुटखा, वाळू, गुरेढोरे वाहतूक करणाऱ्या वाहणांची कसून तपासणी चौकशी केली जात असून कारवाई करण्यात येत आहे मात्र सावदा पोलिस स्टेशनचे हद्दीत सर्वच. *ऑल इज वेल*असल्याचे चित्र सद्यातरी दिसत आहे ना कुठे नाकाबंदी? ना चेकपोस्ट? ना कुठे तपासणी? सावदा पोलिस स्टेशन ला या सर्व बाबींची आवश्यकता नसावी का? का या बाबतीत वरीष्ठाचे सावदा पोस्टेला आदेश नसतील का? निवडणूक आयोग महसुली विभाग कशोसीने प्रयत्न करत आहेत आचारसंहिता चे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे कार्य करीत आहेत मात्र निवडणूक आयोगाच्या प्रमुख अधिकारी यांनी सावदा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता चे नियम अटीतून सुट दिलेली आहे का? मध्यरात्री पर्यंत हॉटेल्स ढाबे सुरू राहत असून खुलेआम बिनदिक्कत अवैध दारू ची राजरोसपणे सर्रास विक्री केली जात आहे अंधाराचे काळोखात मध्यरात्री गुराढोरांची अवैध वाहनांनी वाहतूक केली जाते आहे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या अवैध गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला ची बिनबोभाटपणे तस्करी केली जात आहे अवैध वाळू माफिया वाळू उपसा करीत दबंगगिरी ने सावदा पोलिस स्टेशनचे हद्दीतील चौफेरुन सर्रास वाहतूक केली जाते आहे शासकिय कार्यालयाप्रमाणे कल्याण वरळी मिलन मटक्याचे सट्टा पेढी पत्त्यांचा डाव पोलीस स्टेशन जवळील हाकेच्या अंतरावर खुलेपणाने सुरू आहे यांचेवर कारवाई करण्यासाठी सावदा पोलिस स्टेशनचे सपोनि पोलीस कर्मचाऱ्यांना कधी मुहूर्त सापडणार ? तसेच जळगांव जिल्हयाचे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष वरील सर्व अवैध धंद्याबाबत अन्नभिज्ञ आहेत का? मग कारवाईसाठी विलंब का?असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना भेडसावत आहे यासोबतच सावदा पोलिस स्टेशनचे हद्दीतील अंकलेश्वर बुर्हानपुर महामार्गावर मोठा वाघोदा ते वडगाव दरम्यान सुकीनदी वरील शेवटच्या घटिकेत असलेल्या पोलीस चौकी ची दुरुस्ती तातडीने करुन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व पोलिस चौकी पुर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!