जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आढावा सादर
यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी अतिदुर्गम असलेल्या थोरपाणी या आदिवासी वस्तीवरील दुर्दैवी घटनेची दखल राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली असून[ads id="ads1"]
ते महत्वाच्या कामात व्यस्त असल्याने त्यांनी त्यांच्यातर्फे त्यांचे खास विश्वासातील आमदार संजय सावकारे,आणि यावल रावेर तालुक्याचे सक्रिय समाजसेवक डॉ.कुंदन फेगडे,भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह यावल वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पवार यांनी काल दि.२७ रोजी सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन घटनेचा संपूर्ण आढावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केला.[ads id="ads2"]
आहे.गावात वादळाने सुमारे शंभरावर घरांचे नुकसान झाले, नैसर्गिक आपत्तीमुळे एकाच आदिवासी कुटुंबातील चार जण मरण पावल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे असे डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितले आहे.यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,सरपंच भारसिंग बारेला,सुंदरसिंग पावरा,इक्बाल पावरा,सुरेशसिंग पावरा इत्यादी उपस्थित होते.



