आंबा पाणी येथे वादळामुळे घर कोसळून आदिवासी एकाच कुटुंबातील ४ जण ठार : यावल तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी घडलेली घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल (सुरेश पाटील)

सातपुडा पर्वतरांगेस लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील रामदेव वाडी येथे वादळात काल रविवार दि. २६ मे  २०२४  रोजी रात्री १९:३० वाजेच्या सुमारास एक आदिवासी कुटुंबाचे घर कोसळून ४ जण जागीच ठार झाले,मयतामध्ये  पती-पत्नी, मुलगा, मुलगीचा समावेश आहे यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ रात्रीच घटनास्थळी  भेट दिली.[ads id="ads1"]  

   शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात चारही मयताचे शव आणण्यात आले.वादळी पावसात रात्री झालेल्या  दुर्घटनेत मात्र त्या परिवारातील आठ वर्षाचा बालक सुदैवाने बचावला आहे.

    सातपुड्याच्या किनारपट्टीसह तसेच रावेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये रविवारी दि.२६ मे रोजी संध्याकाळी जोरदार वादळी वारा पाऊस सुरू झाला.या वादळी वाऱ्याने रौद्र रूप धारण केल्याने अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी छत कोसळून अनेक परिवार उघड्यावर आले आहेत.यावल तालुक्याला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. यात अनेक गावांतील शेती शिवारांमध्ये असलेले पीक जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.[ads id="ads2"]  

   तर तालुक्यातील थोरपाणी या आदिवासी बहुल आदिवासी वाडीवस्तीवर वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर मोठा नैसर्गिक आघात झाला आहे. वादळ वाऱ्यामुळे नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते.इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्यामुळे नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण ५ जण ढिगाऱ्याखाली अडकले.त्यांना श्वास घेताना आल्यामुळे गुदमरून नानसिंग गुला पावरा ( वय २८ ), त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा( वय २२) तसेच रतीलाल हा ३ वर्षाचा मुलगा तर बालीबाई ही २ वर्षांची मुलगी जागीच मरण पावली.ढिगाऱ्याखालून याच कुटुंबातील शांतीलाल नानसिंग पावरा ( वय वर्षे ८) हा सुदैवाने घरा बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले.त्याने बचावासाठी आरडा ओरोड करून  परिसरातील लोकांना बोलाऊन 

दुर्घटनेची माहिती दिली. थोरपाणी येथील दुर्घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह थोरपाणी या पाड्यावर धाव घेतली.रात्री उशीरापर्यंत मृतदेह ढिगाऱ्याखालून काढून शवविच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात  पुढील कार्यवाही सुरू केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!