लोकसभेत कमळासह तुतारीचा, आणि इतर चिन्हांचा प्रभाव किती राहणार..?
यावल ( सुरेश पाटील ) रावेर लोकसभा मतदार संघात लोकसभेसाठी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी यावल शहरातील व इतर प्रमुख शहरासह ग्रामीण भागातील अंदाजे ७० ते ८० टक्के समाजसेवकांसह,वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळीं,व्यापारी,व्यावसायिक,किरकोळ विक्रेते यांनी होय इतर सर्व यंत्रणेने ठिकठिकाणी बैठका घेऊन संपर्क साधून जनजागृती सुरू केली होती आणि आहे त्यामुळे संपूर्ण रावेर मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढणार का..? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी मात्र लोकसभेत कमळ, तुतारी, आणि इतर चिन्ह असलेल्या कोणकोणत्या उमेदवारांचा म्हणजे सरकारचा प्रभाव राहणार..? याबाबत जनतेच्या सतत संपर्कात राहणाऱ्या अभ्यासक,जाणकार समाजसेवक,राजकीय पदाधिकारी यांच्याकडून वेगवेगळे प्राथमिक राजकीय अंदाज लावले जात आहेत.[ads id="ads1"]
निवडणूक कोणतीही असो मग ते ग्रामपंचायत नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद सहकारी संस्था शैक्षणिक संस्था किंवा विधानसभा इतर कोणत्याही क्षेत्रातील असो यातून विजयी झालेला उमेदवार आपल्या कार्यक्षेत्रातला १०० टक्के विकास कधीही करू शकत नाही,कारण कारण त्यांच्या कार्यक्षेत्र लक्षात घेता त्यांना निधीसह,शासकीय अटी शर्ती यांच्यासह इतर अनेक अडचणींना समस्यांना सामोरे जावे लागते हे सूर्यप्रकाशा इतके सत्य असल्याने मतदारांच्या,नागरिकांच्या जनतेच्या अपेक्षा लोकप्रतिनिधी कधीही पूर्ण करू शकत नाही. टप्प्याटप्प्यानेच विकास कामे होत असतात. [ads id="ads2"]
यात काही लोकप्रतिनिधींचे काही समर्थक तथा कॉन्ट्रॅक्टर मात्र विकास कामे वेगवेगळ्या कारणांनी अनियमित निकृष्ट दर्जाची करीत असल्याने शासनाविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असतो.
राजकारणात,समाजात काही ठराविक समाजसेवक,संघटना,
लोकप्रतिनिधी पदाधिकारी हे आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या जनतेच्या संपर्कात सतत राहून त्यांचे विविध कामे करून सहकार्य करीत असल्याने त्यांच्या शब्दाला समाजात राजकारणात महत्व प्राप्त होऊन प्राधान्य दिले जाते आणि त्यानुसार त्यांना निवडणुकांमध्ये मतदानातून भरघोस असे सहकार्य मिळते अशाप्रकारे निवडणूक रिंगणातील उमेदवारांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.आणि याच सामाजिक आणि वैयक्तिक हितसंबंध फार महत्त्वाचे ठरतात.राज्यात विधानसभेत लोकसभेत आपल्या समाजाचा व आपला लोकप्रिय उमेदवार पाहिजे अशी सुद्धा अनेकांची भावना आणि श्रद्धा निर्माण होत असते त्यामुळे ऐन वेळेला राजकीय समीकरणे सुद्धा बदलत असतात.
त्याचप्रमाणे आता लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकसभेतील आणि राज्यातील घडामोडी लक्षात घेता देशाचा विकास कोण करू शकतो.? कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील..? आणि कोणाचे सरकार स्थापन होईल याचा सुज्ञ आणि अभ्यासक मतदारांकडून नागरिकांकडून अंदाज लावला जात असून ते मतदाराच्या माध्यमातून योग्य अशा उमेदवारास लोकसभेत पाठवणार असल्याचे राजकारणात चित्र निर्माण झाले असून लोकसभेत कमळ, तुतारी, हाताचा पंजा आणि इतर कोणकोणत्या पक्षांचे चिन्हाचा प्रभाव राहणार याकडे आता समाजाचे नागरिकांचे मतदारांचे लक्ष वेधून आहे.