ज्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून जनतेचा आणि स्वतःचा विकास करून घेतला ते सत्ताधारी गटालाच मदत करणार...!रावेर लोकसभा मतदार संघातील वस्तुस्थिती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल ( सुरेश पाटील ) गेल्या दोन-तीन वर्षातील राज्यात विधानसभेतील राजकीय घडामोडीचा आढावा लक्षात घेतला असता ८०% लोकप्रतिनिधी,मंत्री,आमदार, खासदार यांनी तसेच त्यांच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आप - आपल्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांसाठी आणि स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी आपापल्या पक्षाचे ध्येय उद्दिष्ट बाजूला ठेवून या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात, आणि गटातटात सोयीनुसार उड्या मारल्या आहेत याला म्हणतात सत्ताधारी पक्षाच्या चालू गाडीत बसणे त्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक काही पदाधिकारी कार्यकर्ते हे निवडणुकी त कोणामागे प्रचारार्थ फिरत असले तरी त्यांना नेमका कोणाकडून राजकीय सामाजिक नेतृत्वाच्या माध्यमातून विविध विकास योजनांच्या माध्यमातून नागरिकांचा आणि स्वतःचा विकास करून घेतला आहे ते कोणत्याही परिस्थितीत लोकसभेत ज्यांची सत्ता येणार आहे त्याचा प्राथमिक अंदाज घेऊन त्यांनाच मदत आणि सहकार्य करणार असल्याचे संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघात बोलली जात आहे. [ads id="ads1"]  

   रावेर लोकसभा,विधानसभा मतदारसंघात गेल्या २० ते ३० वर्षाच्या कालावधीत भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत, खासदार,आमदार यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामांच्या विविध योजना राबवून आपापल्या क्षेत्राचा आणि आपल्या स्वतःचा विकास कसा करून घेतला आहे हे सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे,भारतीय जनता पार्टीच्या तथा खडसे कुटुंबीयांच्या आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार यांच्या माध्यमातून ज्यांनी सोयीनुसार विकास करून घेतला ते लोकशाही मार्गाने येत्या लोकसभेतील राजकारणाचा सत्तेचा अंदाज घेऊन आणि भविष्याचा विचार करून योग्य त्या उमेदवारालाच मदत करतील हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. [ads id="ads2"]  

   रावेर लोकसभा,विधानसभा कार्यक्षेत्रात आजही सर्व क्षेत्रात नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या व इतर सर्व स्तरात विविध समस्या,अडी-अडचणी आहेत, अनेक ठिकाणी गैरप्रकार, भ्रष्टाचार,बोगस निकृष्ट प्रतीची कामे झाली आहेत आणि होत आहेत याबाबत आज पर्यंत कोणत्याही जबाबदार लोकप्रतिनिधी अथवा आमदार खासदार यांनी जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी आपला आवाज काढलेला नाही याला काय म्हणावे आणि याचा विचार आता सुज्ञ मतदार शेतकरी नागरिक करायला लागला असल्याने लोकसभा निवडणुकीत नेमका कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार हे निकालांती लवकरच सर्वांना समजणार आहे.

   मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी भाजपने १९९६

( १३ दिवस ), १९९८ ( १३ महिने ) आणि २०१४व २०१९

मध्ये ( पूर्ण ५ वर्षे ) असा, चार वेळाकमी मतदानाचा भाजपला

फटका बसून, सरकार स्थापन करण्यात अडचणी निर्माण

होणार असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांनी केला आहे.देशात मतदान कमी होण्याचे पहिले मुख्य कारण

उष्णतेची लाट मानले जात आहे.दुसरे कारण म्हणजे,

सरकारविरोधात असलेली नाराजीची सुप्त लाट असल्याचे काही प्रमाणात आणि दबक्या आवाजात बोलले जात आहे.

जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोपांची अगदी हिन पातळी गाठली आहे.सध्याच्या राजकारणाचा खालावलेला दर्जा,तसेच रावेर लोकसभा, विधानसभा क्षेत्रातील समस्यांबाबत वेळेवर आवाज न काढणारे आणि राजकीय मुग गिळून गप्प बसणारे काही लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे सुद्धा मतदानाची टक्केवारी घसरण्याचे मोठे कारण समजले जात आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांनी ईडी,सीबीआय

आणि आयकर धाडीच्या भीतीने, किंवा विविध कामे करून स्वतःचा व जनतेचा फायदा करून घेण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश घेऊन राज्यात मंत्रिपदे मिळविली. मराठा,धनगर आरक्षणाच्या

प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम राहिले. राज्यातील शेतकऱ्यांना

दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर

आर्थिक मदत मिळू शकलेली नाही,केळी पिक विमा योजनेत कसा गोंधळ उडाला विमा मिळवून देणारे एजंट कोणाचे होते आणि आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक लोक कशी केली हे त्यांच्या नेतेमंडळींना माहीत असताना सुद्धा शेतकऱ्यांना किती त्रास झाला याबद्दल मतदारांमध्ये

संतप्त भावना आहे. इलेक्टोरल बाँडच्या नावाखाली भाजपने

उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांची देणगी वसूल केल्याचा

मुद्दाही या मतदानात चर्चेत राहिला आहे.राजकारण हा निव्वळ पैशांचा खेळ बनला आहे.सत्तेसाठी कपडे बदलल्या प्रमाणे पक्ष आणि आघाडी

बदलविली जात आहे. आयाराम गयारामांची संख्या

वाढली आहे.ऐनवेळी कुठल्यातरी पक्ष,आघाडीचे बाशिंग बांधून निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नेत्यांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे वर्षोनुवर्षे एकाच पक्षात राहून निष्ठेने काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकत्यांची मोठी कोंडी आणि गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात भाजपने उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडल्यामुळे जनतेमध्ये

नाराजीचा सूर आहे.महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला

पळवून नेण्याचा तसेच महागाई व बेरोजगारीचा मुद्दा

महत्त्वाचा ठरला आहे.यावल तालुक्यातील मधुकर कारखाना बंद का पडला..? जे टी महाजन सहकारी सूतगिरणी बंद का पडली तालुका शेतकरी संघ अडचणीत का आला. ? यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल लिलाव पद्धतीने का घेतला जात नाही..? इत्यादी समस्या आणि प्रश्नाबाबत सर्वच गप्प का आहेत..? गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमदार, खासदार यांनी कसा समन्वय साधला विजयी झाल्यावर

हातात हात घालून शुभेच्छा प्राप्त करून घेण्यासाठी कसे लोटांगण घातले हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. प्रचार करताना यांचे हा भाव कसे आहेत हे मतदारांना, सर्व समाजाला बघायला मिळत

आहे.तिकीट वाटपात अन्याय झाल्यामुळे अंतर्गत धुस-पुस आणि मतभेदाची बंडखोरीची

समस्या पक्षांमध्ये आहे. कार्यकर्त्यांची मने जुळली

नसल्यामुळे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम मतदानाची टक्केवारी

घटण्यात झाल्याचे दिसून येईल किंवा नाही हे प्रत्यक्ष काही दिवसात समजणार आहे.

    राजकीय पक्षातर्फे उमेदवारी देताना आणि उमेदवारी मिळविताना कशा घडामोडी झाल्या,आमदार शिरिष चौधरी  यांनी राजकीय ध्येय धोरणानुसार,उद्दिष्टानुसार भाजपा विरोधात जी भूमिका घेतली त्याबाबत संशय व्यक्त केला जात असून रावेर लोकसभा क्षेत्रात ३० ते ४० टक्के मतदारांमध्ये नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत असून त्याचा विपरीत

परिणाम मतदानावर पडणार अंदाज वर्तविला जात आहे.

##################################


रावेर तालुक्यात रक्षाताई खडसे व यावल तालुक्यात श्रीराम पाटील यांच्या विरोधात गुप्त राजकीय षडयंत्र

रावेत लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातीलच  जिल्ह्यातील माजी जिल्हा पदाधिकारी प्रचार यंत्रणा राबविताना तसेच यावल तालुक्यातील जबाबदार एक पदाधिकारी श्रीराम पाटील यांच्या विरोधात त्यांच्या खास कट्टर समर्थक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गुप्त हालचाली  सुरू केल्याचे, तसेच या दोघं उमेदवारांचे हे खास विरोधात शरीराने प्रचार यंत्रणेत सहभागी असले तरी मनाने ते आपल्या आवडत्या नेत्याच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच निवडणूक प्रक्रियेत कामकाज करीत असल्याचे असे संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदारांमध्ये उघडपणे बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!