पेपरच्या १ तास आधी प्रश्नपत्रिका केंद्राच्या बाहेर येते कुठून.. १० विद्यार्थ्यांवर कारवाई
यावल (सुरेश पाटील)
यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची परीक्षा सुरू आहे.परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी यावल शहरात प्रश्नपत्रिका परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन कशी काय उपलब्ध केली जाते..? याबाबत परीक्षा केंद्रात मुक्त विद्यापीठ परीक्षेत विद्यापीठाचे सर्व नियम,अटी,शर्ती कचराकुंडीत टाकून परीक्षेचे कामकाज सर्वानुमते होत असल्याने शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]
परीक्षा केंद्राबाहेर प्रश्नपत्रिका पाठविणारे कोण..? परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका केंद्राच्या बाहेर कोणामार्फत जाते..? केंद्राबाहेर प्रश्नपत्रिका पाठवणाऱ्यांवर कारवाई का नाही..? केंद्राबाहेर प्रश्नपत्रिका विक्री करणारी यंत्रणा कोणाची.? असे असताना मात्र गुरुवार दि.३० मे २०२४ रोजी १० विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याने शिक्षण क्षेत्रात परीक्षा कामकाजाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.[ads id="ads2"]
गुरुवारी विद्यापीठाचे भरारी पथक दिवसभर परीक्षा केंद्रात तळ ठोकून होते तत्पूर्वी महाविद्यालयात बीएबीकॉम, तसेच एमए च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला दोन सत्रात तपासणी अंती १० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती परीक्षा केंद्र प्रमुखांनी ठराविक प्रसिद्धी माध्यमांना दिली.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ परीक्षा बैठक व्यवस्थेबाबत आणि परीक्षेबाबत केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी प्रसिद्धी माध्यमांना माहिती एकाच वेळी केव्हा आणि कोणाला दिली..? किंवा कोणालाच माहिती दिली नव्हती का..? याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून १० विद्यार्थ्यांवर कारवाई केली परंतु परीक्षा केंद्राबाहेर प्रश्नपत्रिका जाते कशी याबाबत कारवाई न झाल्याने परीक्षा केंद्राबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विद्यालयातील काही ठराविक मात्र आपल्या आवडत्या प्रसिद्धी माध्यमात आपल्या नावासह चमकोगिरी करून घेत असल्याने परीक्षा केंद्र व्यवस्थेबाबत अनेक विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तरी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संचालक आणि सचिव यांनी लक्ष केंद्रित करून यावल येथील परीक्षा केंद्राची सविस्तर सखोल चौकशी करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.



