वानखडे दाम्पत्यांनी एकुलती एक मुलगी धम्माला दिली दान : डॉ. श्रेया वानखडे झाल्या आर्या संबोधी ; आजीवन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

वानखडे दाम्पत्यांनी एकुलती एक मुलगी धम्माला दिली दान : डॉ. श्रेया वानखडे झाल्या आर्या संबोधी ; आजीवन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणार

अमरावती(प्रतिनिधी)

 शहरातील अडवाणी नगर, गोपाल नगर परिसरातील एका बौद्ध दांपत्यांनी  आपल्या उच्चशिक्षित २४ वर्षीय एकूलत्या एक मुलीला तिच्या वाढदिवसाच्या दिवसीच बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारा करिता धम्माला दान केले आहे. धम्मदीक्षा घेणाऱ्या युवतीचे नाव डॉ. श्रेया वानखडे आहे.  प्रवज्या घेऊन गृहस्थ जीवनाचा त्याग करून बौद्ध धम्माची श्रामनेर दीक्षा  घेतली आहे.

 उपसंपादित होऊन आजीवन भिक्खूनीचे जीवन जगण्याचा डॉ श्रेया यांनी संकल्प केला आहे. सोमवार (ता.६) रोजी अनाथ पींडक बुद्धविहार ,पोहरा आसेगाव पूर्णा    सोहळा आयोजित करण्यात आला होता.  बौद्ध  भिख्खूच्या उपस्थितीत  सोहळा पार पडला.[ads id="ads1"]  

    उपसंपदा  दिक्षांत   सोहळ्याला  भदंत बुद्धप्रिय , आर्या प्रजापती महाथेरी,भदंत शिलरत्न  यांच्या उपस्थितीत श्रामनेर दीक्षा घेतली. यावेळी डॉ. श्रेया ची आई ज्योती वानखडे व वडील ईश्वर वानखडे यांच्या सह बौद्ध उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होत्या. दीक्षा विधी पूर्ण झाल्यानंतर डॉ श्रेया वानखडे यांचे नाव बदलून आर्या संबोधी असं ठेवण्यात आलं आहे.यापुढे डॉ. श्रेया वानखडे (आर्य संबोधी) बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. डॉ. श्रेया वानखडे यां दंतचिकित्सक(बिडीएस)आहे बुद्ध धम्मा प्रति आस्था असल्याने दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.[ads id="ads2"]  

 लहानपणापासून  डॉ. श्रेया या आपल्या कुटुंबीयांसोबत बौद्ध विहारात जात असत.डॉ. श्रेया  बालपणा पासूनच बौद्ध भिक्खू च्या सहवासात राहून बौद्ध धम्माच्या प्रभावात आहेत.त्याची भेट भदंत बुद्धघोष महास्थविर  झाली आणि आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याचं डॉ. श्रेया यांचे म्हणणं आहे. महत्वाची बाब म्हणजे एकुलत्या एक मुलीच्या या निर्णयानंतर आपण समाधानी असल्याचं आई-वडिलांनी सांगितलं.

डॉक्टर श्रेया या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असून त्याच अडवाणी नगर, गोपाल नगर परिसरात  सगळं लहानपण  गेलेलं. पण आता तिने उपसंपदा घेऊन धम्माचा मार्ग स्वीकारला आहे. यानंतर आयुष्यभर ती बौद्ध भिकुनी  म्हणून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणार आहे. दीक्षा घेतल्यानंतर डॉक्टर श्रेया यांचे आयुष्य पुरतं बदलून जाणार आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!