राज्यस्तरीय धम्मभूषण पुरस्कार-२०२४ ने प्रा.गजेंद्र गवई सन्मानित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


बुलढाणा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : विश्ववंदनीय, करुणासागर, विश्व शांतिचे अग्रदूत तथागत भगवान बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंती निमित्ताने रिपब्लिकन न्यूज़ पेपर्स असोसिएशन च्या वतीने जीवनभर अविरत धम्म प्रचार प्रसार करणाऱ्या लॉर्ड बुद्धा टीव्ही चे संवाददाता धम्मसेवक प्रा गजेंद्र  गवई यांना बुलडाणा येथील पत्रकार भवन येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळयात "राज्यस्तरीय धम्मभूषण पुरस्कार -२०२४" ने मान्यवारांच्या हस्ते सत्कारपूर्वक सन्मानित करण्यात आले.[ads id="ads1"]  

 बुलडाणा पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा सेनेचे तथा बुलडाणा आमदार संजयभाऊ गायकवाड़ यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड़ होते तर मुख्य अतिथि मार्गदर्शक सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका मायाताई दामोदर,उद्घाटक डीवायएसपी पाटिल साहेब, दैनिक विश्वजगत चे मुख्य संपादक चंद्रकांत बदरे,जेष्ठ साहित्यिक अड. विजयकुमार कस्तूरे,संघर्ष साळवे औरंगाबाद, रिपब्लिकन न्यूज़ पेपर्स असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष प्रा. एस. पी.  हिवाले , आयोजक प्रा. भास्कर इंगले यांची विशेष उपस्थिति होती.[ads id="ads2"]  

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत यांचे प्रतिमा पूजनाने उद्घाटन करून प्रा गजेंद्र गवई यांनी बुद्धवंदना घेतली.

 पुरस्कार वितरण सोहळयात प्रा गजेंद्र गवई यांनी गेल्या 30 वर्षापासून विविध धम्ममय उपक्रमातून धम्म प्रचार व प्रसार कार्य केले, सदर धम्म कार्यात दे माली येथे भव्य विश्वशांति बुद्ध विहार निर्मिति, धम्म परिषदाचे यशस्वी आयोजन, अनेक श्रामनेर शिबिर आयोजन , उपासिका शिबिरआयोजन, सुप्रसिद्ध कवि गायक, प्रबोधनकार यांचे प्रबोधनात्मक कार्यकमांचे यशस्वी आयोजन,सामुहिक विवाह सोहले आयोजन, भीम बुद्ध गीत लेखन, संग्रह प्रकाशन, धम्म दिनदर्शिका प्रकाशन, ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्षात ३५ किमी च्या परिघातिल ६७ गावात "गाव तिथे उपासक उपासीका संघ " स्थापना, लॉर्ड बुद्धा टीव्ही च्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोन हजार पेक्षा जास्त बुद्ध विहारात धम्ममय संविधान प्रबोधन, व्याख्यान, प्रवचन अगणित कार्यक्रम , गीत गायन प्रबोधन, भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथांचे 200 ठिकाणी मोफत वाटप,गीत संगीत कार्यकमांचे यशस्वी सादरिकरन करून समाज प्रबोधन इत्यादि कार्याची दखल घेऊन दैनिक विश्वजगत चे मुख्य संपादक चंद्रकांत बदरे यांचे शुभ हस्ते व मान्यवरांचे उपस्थितित स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यापूर्वी सुद्धा प्रा गजेंद्र गवई यांना २४०पेक्षा जास्त राष्ट्रीय स्तर ते स्थानिक स्तरावर विविध क्षेत्रातील कार्याची विशेष दखल घेऊन शासकीय, निमशासकीय,विविध संस्था, संघटना यांनी पुरस्कृत करून सन्मानित केले आहे.

 सदर धम्मभूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल जोमाने धम्मकार्य करण्यास आत्मबल मिळाले असे मत मनोगतात व्यक्त केले.सदर राज्यस्तरीय धम्मभूषण पुरस्कार -2024  मिळाल्या मुळे राज्यभरातून प्रा गजेंद्र गवई यांचे अभिनंदन होत आहे.सदर कार्यक्रमाच्या संचालन व आभार आयोजक प्रा. भास्कर इंगले यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!