रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात २१ जुन २०२४ हा दिवस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास व क्रीडा विभाग स्थापित "योगा वेलनेस सेंटर" अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने उपस्थित होते. [ads id="ads1"]
प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील प्रा. डॉ. पी. आर. महाजन उपस्थित होते. रासेयो विभागीय समन्वयक डॉ. जे. पी. नेहेते यांनी व्यायाम तसेच योगचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे, रोज योग केल्याने ताणतणावपासून आपण दूर राहतो असे सांगितले. तसेच प्रशिक्षक डॉ. महाजन यांनी नियमित योगासने केल्याने आपली हाडं, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात, त्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते असे सांगितले. योग साधनेने असाध्य रोगांपासून आपल्यला मुक्ती मिळू शकते. [ads id="ads2"]
माणसाला जीवनात सुखी व निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे विशेष महत्व आहे. योगासने केल्याने विविध आजारांपासून मुक्तता मिळू शकते असेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी अध्यक्षीय भाषणात माणसाने योगसाधनेची मार्गदर्शक तत्वे आचरणात आणल्यास मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण प्राप्त होते असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमा नंतर योग प्रशिक्षक प्रा. डॉ. पी. आर. महाजन यांनी उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विविध प्रकारचे योगासने करवून घेतली. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



.jpg)